Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडसामान्यांचं आर्थिक गणित अजून कोलमडणार घरगुती गॅस २५ रुपयांनी महागला!

सामान्यांचं आर्थिक गणित अजून कोलमडणार घरगुती गॅस २५ रुपयांनी महागला!


सर्वसामान्यांना या महागाईचा फटका, बीडमध्ये ८८६ ला झाला घरगुती गॅस, सबसिडी केवळ ९. ९० पैशे
बीड (रिपोर्टर)- सामान्य माणसाच्या खिशाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा एलपीजीच्या किंमतीत वाढ केली आहे. विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर दिल्लीमध्ये घरगुती वापरासाठी १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत ८५९.५ रुपयांवर गेली आहे. ही वाढ सोमवारी रात्रीपासूनच लागू झाली आहे. १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची कोलकातामध्ये ८८६ रुपये, मुंबईत ८५९.५ रुपये आणि लखनऊमध्ये ८९७.५ रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही ६८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत त्यांची किंमत वाढून १६१८ रुपये झाली आहे.बीड मध्ये आता गॅस ८८६ रुपयाला झाला आहे तर केंद्रसरकार सबसिडीच्या स्वरूपात केवळ नऊ रुपय नव्वद पसे दिली जात आहे


२०२१ च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढून ७१९ रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली. १५ फेब्रुवारीला पुन्हा किंमत वाढून ७६९ रुपये करण्यात आली. यानंतर, २५ फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलेंडरची किंमत कमी होऊन ७९४ रुपये झाली. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ८१९ रुपये करण्यात आली. एप्रिलच्या सुरुवातीला १० रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत ८०९ रुपयांवर गेली होती. एका वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १६५.५० रुपयांची वाढ झाली आहे. तर डिसेंबरपासून आतापर्यंत सिलिंडरच्या किमतीत सुमारे २७५ रुपयांनी वाढ झाली आहे. तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ आणि १५ तारखेला एलपीजीच्या किंमतीचा आढावा घेतात. यापूर्वी १ जुलै रोजी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ केली होती. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या सतत वाढत असलेल्या किंमतींमुळे केंद्र सरकारवर बरीच टीका होत आहे. केंद्रसरकारच्या कर वसुली धोरण मुळे देशातील सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाल्याची प्रतिक्रिया सर्व स्थरातून व्यक्त होत आहे

Most Popular

error: Content is protected !!