Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडस्त्रियांना शेतकरी म्हणून ओळख मिळवून द्या -कुलकर्णी, तोकले

स्त्रियांना शेतकरी म्हणून ओळख मिळवून द्या -कुलकर्णी, तोकले

बीड (रिपोर्टर):- शेतीमध्ये महिलांचं योगदान मोठ्या प्रमाणात आहे मात्र पितृसत्ताक संस्कृतीमुळे शेती ही पुरुषांच्या नावावर असल्याने महिलांच्या कष्टाची तितकी नोंद घेतली जात नाही. महिलांच्या हक्कासाठी स्त्रियांना शेतकरी म्हणून ओळख मिळवून द्यावी, अशी मागणी सीमा कुलकर्णी, मनीषा तोकले यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.


महिला किसान अधिकार मंचच्या वतीने आज स.मा.गर्गे वाचनालय या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना कुलकर्णी म्हणाल्या की, राष्ट्रीय शेतकरी धोरण २००७ मध्ये परिभाषित केलेल्या शेतकर्‍यांच्या व्याख्येनुसार स्त्रियांना शेतकरी म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी ‘ऍडवोक्सी’ करावी, अशी मागणी करत त्या पुढे म्हणाल्या की, शेतकरी स्त्रियांसाठी प्रशिक्षण व क्षमता विकासाचे कार्यक्रम आयोजीत करावे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली आहे. या पत्रकार परिषदेला स्वाती सातपुते, कामिनी पवार, पल्लवी हर्षे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!