Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeकोरोना२०७९ टेस्टमध्ये आढळले ५८ बाधीत

२०७९ टेस्टमध्ये आढळले ५८ बाधीत

बीड (रिपोर्टर)- शाळा सुरू करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या अँटीजेन टेस्ट घेणे सुरू आहे. काल दिवसभर २०७९ शिक्षकांच्या आणि इतर नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ५८ जण बाधीत आढळून आले आहेत. मात्र यातील शिक्षक किती हे समजू शकले नाही.
आरोग्य विभागाला दुपारी १ वाजता २ हजार ७९ तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २०२१ निगेटिव्ह तर ५८ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई १४, आष्टी १३, बीड ११, धारूर ४, गेवराई ४, केज ३, माजलगाव २, परळी १, पाटोदा-शिरूर प्रत्येकी १ तर वडवणीत दोन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

महाराष्ट्रासह चार राज्यांकडून
सर्वोच्च न्यायालयानं मागवला अहवाल

नवी दिल्ली (वृत्तसेवा)-सण उत्सवाच्या काळात करोनाचा प्रसार वाढून दुसरी लाट येऊ शकते, असा इशारा केंद्रीय समितीने दिला होता. तशीच परिस्थिती देशात निर्माण होताना दिसत असून, अनेक राज्यांमध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. या परिस्थितीवर सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्रासह चार राज्यांना सद्य परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती आर.एस. रेड्डी व एम. आर. शाह यांचा समावेश असलेल्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यातील करोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!