Tuesday, January 25, 2022
No menu items!
HomeUncategorizedअवैध वाळू उपसा प्रकरणी आष्टीत गुन्हा दाखल

अवैध वाळू उपसा प्रकरणी आष्टीत गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर):- आष्टी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. चिखली येथे एकाने वीस ब्रास वाळू उपसा करून तिचा साठा केल्याची माहिती महसूलच्या पथकाला मिळाल्यानंतर महसूलच्या पथकाने पोलीसांसह चिखली येथे धाड टाकून पोपट भाऊसाहेब गायकवाड रा.चिखली याने अवैध वाळू उपसा केलेली २२ ब्रास वाळू जप्त केली.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा आणि वाहतूक होत आहे. आष्टी तालुक्यातील चिखली येथे अवैध वाळूचा उपसा करून त्याचा साठा केल्याची माहिती महसूलच्या पथकाला मिळाल्यानंतर महसूलच्या पथकाने काल त्याठिकाणी पोलीसांसह धाड टाकली असता तेथे २२ ब्रास वाळू मिळून आली. ती जप्त करून पोपट भाऊसाहेब गायकवाड याला पोलीसांनी ताब्यात घेवून त्याच्या विरोधात तलाठी विठोबा नागप्पा बनगर यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.ना.गुज्जर हे करत आहेत.

टिप :- बातमीत वापरलेला फोटो ‘ फाईल फोटो’ आहे

Most Popular

error: Content is protected !!