Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनाआजच्या अहवालात आष्टीत सर्वाधिक पॉझिटिव्ह

आजच्या अहवालात आष्टीत सर्वाधिक पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर)- कोरोना रुग्णांची संख्या प्रत्येक तालुक्यात कमी-जास्त प्रमाणात येत आहे. मात्र आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील संसर्ग होत नाही. आज आलेल्या अहवालातही आष्टी तालुक्यात तब्बल ६६ जण बाधित आढळून आले तर जिल्ह्याचा आकडा १४३ वर गेला आहे.
आरोग्य विभागाला आज ५ हजार ८५२ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ५ हजार ७०९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून १४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये अंबाजोगाई ७, आष्टी ६६, बीड १२, धारूर ३, गेवराई, केज प्रत्येकी ८, धारूर ५, पाटोदा २०, शिरूर २ तर वडवणी तालुक्यात १२ रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!