प्रत्येक योजना घरापर्यंत पोहचण्यासाठी सरकार कटिबद्ध -आ. पवार
गेवराई (भागवत जाधव): राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या सुचनेवरून राज्य शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत व्हावी आणि त्यांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा म्हणून बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम ठिकठिकाणी होत असून आज गेवराई येथे आयोजीत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी जिल्हाधिकारी यांनी शेतकर्यांनी आशावादी राहून प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तर आ. लक्ष्मण पवार यांनी प्रत्येक शासकीय योजनेला जनतेच्या घरात पोहचविण्यासाठी युती सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून या योजना तळागाळापर्यंत गेल्या पाहिजे, ही आपली भूमिका असल्याचे म्हटले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आ. पवारांच्या पुढाकारातून रोजगार हमीची कामे पुन्हा सुरू झाल्याचे म्हटले.
या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, सीईओ अजित पवार, सहायक जिल्हाधिकारी आदित्य जीवने, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनिल यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार संदीप खोमणे, गटविकास अधिकारी डॉ.सचिन सानप, मुख्याधिकारी विशाल भोसले, तालुका कृषी अधिकाई अभय वडकुते, बीड गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांच्यासह सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या की, आज सरकारच्या वतीने शेतकर्यांसाठी अनेक लाभदायी योजना राबविण्यात येत आहेत. मात्र अनेक शेतकरी शेती करताना शासकीय योजनांपासून दूर राहतात परंतु प्रत्येकाने प्रगत शेती हे धोरण राबवत आशावादी राहून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन शेती
केली तर नक्कीच यातून आपल्याला मोठा नफा मिळेल. आजच्या बदलत्या काळानुसार ठिबक सिंचन, फळबाग लागवड, रेशीम उद्योग असे वेगवेगळे प्रयोग करून सुधारित शेती करण्यासाठी कायम आशावादी रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी या कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले. तर आ. लक्ष्मण पवार म्हणाले की, आज पहिल्यांदाच गेवराई पंचायत समितीच्या माध्यमातून 1 हजार 75 जलसिंचन विहिरींना मंजुरी मिळतेय यापूर्वीही या योजना चालू होत्या परंतु राजकीय महत्वाकांक्षे पोटी अडवणूक करत कोर्ट कचेरी करून जनतेला वेठीस धरण्याचे काम राजकीय पुढार्यांनी केले आहे. परंतु आज माझ्या काळात विना तक्रार 1 हजार 75 जलसिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली असून आणखी वाढीव 400 ते 500 विहिरींना मंजुरी मिळवून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, गटविकास अधिकारी डॉ.सचिन सानप यांची सकारात्मक भूमिका आसल्याचे त्यांनी सांगितले व यापुढे शासनाची प्रत्येक योजना आम्ही जनतेच्या घरापर्यंत पोहचवण्यासाठी भाजप- शिवसेनेचे हे सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरकुल योजना, जलसिंचन विहीर, नरेगा अंतर्गत शेत तलाव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन, उसतोड कामगार ओळख पत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, घरगुती विज जोडणी, ना हरकत, निराधार आसल्यांचा दाखला, ग्रामपंचायत येणे बाकी नसल्या बाबत, जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, सातबारा आठ अ वाटप, दारीद्ररेषेचे प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत कार्ड, जननी सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक वाटप, बचत गटांना कर्ज वाटप, दिव्यांना जीवनावश्यक वस्तुसाठी अनुदान, स्वच्छ भारत मिशन वैयक्तिक शौचालय अनुदान, विशेष घटक योजना गाय गट, शेळी गट, संजयगाधी, निराधार, श्रावणबाळ, निवडणूक ओळखपत्र, संकीर्ण (उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाणपत्र), पि. एम. किसान, आधार आपडेट, आदि योजने संदर्भात योग्य ती माहिती देऊन लाभार्त्यांना विविध योजनेचे मंजुरीपत्र व दाखल्यांचे वाटप करण्यात आले. आ. लक्ष्मण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. दरम्यान कार्यक्रम स्थळी नागरिकांसाठी वरील सर्व शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी शासकीय स्टॉल उभारण्यात आले होते यातून सर्व लाभार्थींना प्रत्येक योजनांची माहिती देण्यात येणार आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संदीप खोमणे यांनी सूत्रसंचालन युवा वक्ते राहुल गिरी केले तर आभार डॉ.सचिन सानप यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.