Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनाही तिसर्‍या लाटेबाबत धोक्याची सूचना अजित पवारांनी पुण्यात बोलताना दिला इशारा!

ही तिसर्‍या लाटेबाबत धोक्याची सूचना अजित पवारांनी पुण्यात बोलताना दिला इशारा!


मुंबई (रिपोर्टर)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पुणे जिल्हा आणि पुणे शहर या भागातील करोनाच्या परिस्थितीविषयी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी पुण्यातील करोनाच्या परिस्थितीवर आणि जागतिक स्तरावर करोनाच्या वाढणार्‍या रुग्णांविषयी चिंता व्यक्त केली. तसेच, पुण्यात या सर्व परिस्थितीशी लढण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी, जागतिक स्तरावरील करोनाबाबत बोलताना अजित पवार यांनी तिसर्‍या लाटेचा धोक्याचा इशारा देखील दिला आहे.
तिसर्‍या लाटेसाठी काळजी घेत आहोतयावेळी बोलताना अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या लसीकरणाविषयी माहिती दिली. पुणे जिल्ह्यात 70 लाख नागरिकांना लसीकरण करण्यात आलं आहे. जागतिक स्तरावर सध्या 5 ते 6 लाखांच्या दरम्यान रोजचे करोनाबाधित आढळत आहेत. ही तिसर्‍या लाटेबाबत धोक्याची सूचना आहे. त्यामुळे आम्ही काळजी घेत आहोत, असं अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यात तिसर्‍या लाटेसाठी पूर्वतयारी सुरू पुण्यात गेल्या 4 आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.

Most Popular

error: Content is protected !!