Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईम‘सक्सेस’ दरोड्याला कंट्रोलच्या अधिकार्‍यांनी केले ‘अनसक्सेस’

‘सक्सेस’ दरोड्याला कंट्रोलच्या अधिकार्‍यांनी केले ‘अनसक्सेस’


अट्टल 12 दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठी निघाले असतांना धुळे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील चौसाळा बायपास रस्त्यावर एक कंटेनर समोरुन येत असल्याचे दिसताच त्यांनी रस्त्यावर आडवा जॉक टाकून कंटेनर चालकाला थांबवण्यास भाग पाडले. चालक जसा खाली उतरला तसाच 12 जणांनी घेरला अन् लाट्या काठ्यांनी धो… धो… धूतला हायतपाय बांधून त्याच कंटेनरमध्ये टाकला. त्याच्या सोबत असलेल्या दुसर्‍या चालकाचेही हातपाय बांधण्यात आले. दोघांचेही मोबाईल अन् खिशातील नगदी रक्कम हिसकावून घेत यातीलच एका चोरट्याने कंटेनर सुरु करुन तो नांदुर मार्गे लातूरला पळवला. ही थरारक घटना 19 जून 2021 च्या रात्री 11.30 वा चौसाळा बायपासवर घडली. कंटेनर घेवून दरोडेखोर लातूर ला जात असतांना त्या कंटेनरमध्ये नेमक काय असेल? याची चोरट्यांना उत्सुकता लागली होती. वाटेतच एका चोरट्याचे नांदुर फाटा येथे घर असल्याने चोरट्यांनी तेथे कंटेनर थांबवून आतमध्ये कशाचा माल आहे. हे पाहण्यासाठी सर्वच चोरटे खाली उतरले अन् तेवढयात दोन्ही चालकांनी कसे बसे आपले बांधलेले पाय सोडून कंटेनर मधून उड्या टाकून पळ काढला. अन् शेतकर्‍यांच्या मदतीने कंटेनर मालकाला फोन केला. त्या कंटेनर मालकाने बीड कंट्रोलला फोन करुन घटनेची माहिती दिली अन् दरोडेखोरांनी सक्सेस केलेल्या दरोड्याला कंट्रोलच्या अधिकार्‍यांनी मोठ्या शिताफीने लातूर पोलिसांच्या मदतीने अनसक्केस करत अवघ्या काही तासात आरोपीच्या मुद्देमालासह मुसक्या बांधल्या.

crime dayri logo 2

आध्रप्रदेश येथून पारलेजी बिस्कीटचे बॉक्स घेवून बीड मार्गे गुजरात येथे कंटेनर (क्र. एम. एच. 40 बी. जी. 4596) ने चालक अस्लम खान सादेख खान (वय 37 वर्षे, रा. बावला ता. तावडू जि. मेवात राज्य हरियाना) व दुसरा चालक शोएब खान हे जात असतांना धुळे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील चौसाळा बायपास रस्त्यावर त्यांना एक जॉक पडलेला दिसला. तो जॉक आपण घ्यावा या उद्देशाने चालकाने रात्री 11.30 वाजता कशाचाही विचार न करता कंटेनर थांबवून जॉक उचलण्याचा प्रयत्न केला अन् तेथे अगोदरच दबा धरुन बसलेल्या 12 चोरट्यांनी त्या चालकावर लाट्या काठ्यांनी हल्ला चढवला. नेकम काय घडलं हे समजण्याचा आत चोरट्यांनी त्याचे हात पाय बांधले. दुसर्‍या चालकालाही बेदम मारहान करत त्याचेही हातपाय बांधून दोघांनाही त्याच कंटेनर मध्ये टाकले. अन् यातील एका चोरट्याने कंटेनर सुरु करुन तो नांदुर फाटा मार्गे लातुरला पळवला. मात्र मोठ्या प्रयत्नाने अन् धाडसाने पळवलेल्या या कंटेनरमध्ये नेमकं असेल तरी काय? हेच चोरट्यांना माहित नव्हतं. त्यामुळे आतमध्ये कशाचा माल आहे. हे पाहण्याची सर्वच चोरट्यांना उत्सुकता लागली. वाटेतच नांदुर फाटा येथे एका चोरट्याचे घर असल्याने त्यांनी तेथे टेम्पो थांबवला अन् पाठीमागे जावून यामध्ये नेमका कशाचा माल आहे हे तपासू लागले. तेवढ्यातच दोन्ही चालकांनी संधीचा फायदा घेवून बांधलेले पाय सोडून कंटेनरमधून उड्या टाकून पळ काढला. दोन्ही चालक लांब गेल्यावर चोरट्यांना दिसले त्यामुळे चोरट्यांनी त्यांचा पाटलाग केला नाही. कंटेनरमध्ये चॉकलेट अन् बिस्किट असल्याने चोरट्यांनी काही बॉक्स हे नांदुर येथील एका चोरट्याच्या घरी ठेवले अन् तसाच कंटेनर लातुरच्या दिशेने पळवला. इकडे दोन्ही चालक जखमी अवस्थेत रात्री दिसेल त्या वाटेने शेतातून पळ काढत होते. तेवढ्यात नांदुरघाट शिवारात असलेल्या एका वस्तीवरील जाधव नामक शेतकरी त्यांना भेटले अन् चालकांनी त्याला आपबीती सांगितली. शेतकर्‍याचा मोबाईल घेवून त्या चालकाने कंटेनर मालकाला फोन करुन घटनेची माहिती दिली. कंटेनर मालक मनोज चोबे (रा. इंदोर) यांनी थोडाही वेळ वाया न घालवता तत्काळ बीड पोलिस कंट्रोलला फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. अन् आपल्या कंटेनरला जी.पी.एस सिस्टिम असून त्याचे लोकेशन मी घेत असल्याचे बीड पोलिसांना त्यांनी सांगितले. त्यावेळी बीड कंट्रोलला कर्तव्यावर असलेले एपीआय विजयसिंग जानवळ यांनी तत्काळ याची दखल घेवून प्रथम उस्मानाबद कंट्रोलला सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्या कंटेनरचे लोकेशन लातुरच्या दिशेने असल्याने त्यांच्या लक्षात आल्यानंतर लगचे लातूर कंट्रोलशी त्यांनी संपर्क साधून त्यांना या विषयी माहिती दिली. जी.पी.एस प्रणालीव्दारे एपीआय विजयसिंग जानवळ हे त्या कंटेनरच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. पोलिसांना त्या विषयी माहिती देत होते. त्या कंटेनेरच्या लोकेशनवरुन त्याचा पाटलाग करुन अखेर पहाटे तो कंटेनर लातूर पोलिसांनी गातेगाव (जिल्हा लातूर) येथे पकडला. त्यावेळी बबन सरदार शिंदे (वय 34 वर्षे, रा. नांदुरघाट ता. केज), सचिन शिवाजी काळे (वय 23 वर्षे), अनिल बप्पा काळे (वय 24 वर्षे) दोन्ही रा. पारा ता. वाशी जि. उस्मानाबाद) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या अन् नेकनुर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पीएसआय किशोर काळे, जायभाय, नवले, कांबळे यांनी लातूर पोलिस ठाण्यात जावून आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यानंतर सकळाी दि. 20 जून 2021 रोजी अस्लम खान सादेख खान या चालकाच्या फिर्यादीवरुन नेकनुर पोलिस ठाण्यात गुन्हा. र. नं.148/2021 कलम 395,397 भादवी 12 आरोपिंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नेकनुर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत त्या चालकाने म्हटले आहे की, दि. 19 जून रोजी रात्री 11.30 वाजता. 12 आरोपींनी संगनमत करुन हातपाय बांधून काठीने व लोखंडी गजाने तोंडावर हातावर पायावर मारहाण करुन जखमीकेले. व कंटेनरसह त्यामध्ये असलेले पारले कंपणीचे बिस्कीटचे 1400 बॉक्स त्याची किंमत 14 लाख व माझ्या खिशातील नगदी 14 हजार व एक मोबाई तर दुसर्‍या चालकाच्या खिशातील नगदी 6 हजार आणि एक मोबाईल एकूण 13 हजार असा एकूण 34 लाख 35 अजाराचा मुद्देमाल गेल्याचे फिर्यादीत म्हटले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले तेव्ह त्यांच्याकडून 33 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हा घडला त्याच दिवशी कंटेनर सह तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते मात्र इतर आरोपीच्या मुसक्या बांधने महत्वाचे असल्याने नेकनुर पोलिस ठाण्याचे एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी तपासाची चक्रे गतीमान करत आरोपीच्या शोधासाठी पथक पाठवले नांदुरघाट शिवारातून दोन तर वाशी पोलिस ठाणे हद्दीतून 3 आरोपी पोलिस उपनिरिक्षक किशोर काळे, संजय राठोड, दिपक खांडेकर यांनी अत्यंत कौशल्याने पकडून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलिस कस्टडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता ते सध्या न्यायालनीय कोठडीत आहेत. सदरील कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनुर पोलिस ठाण्याचे ठाणेप्रमुख लक्ष्मण केंद्रे, पोलिस उपनिरिक्षक किशोर काळे, दिपक खांडेकर, संजय राठोड, अमोल नवले, प्रशांत क्षीरसागर यांनी केली. यामध्ये महत्वाची भूमिका ही बीड कंट्रोलला कर्तव्यावर असलेले एपीआय विजयसिंग जानवळ आणि त्यांच्या टिमची होती. त्यांनी रात्रीतूनच जीपीएस प्रणाली व्दारे कंटेनरच्या हालचालीवर लक्ष ठेवून सदरील आरोपींच्या मुसक्या बांधण्यात लातूर पोलिसांना मोठी मदत केली. यातील चार आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!