Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडपावसाचा जोर वाढेना, तीन दिवसांपासून नुसती रिमझिम आणि ढगाळ वातावरण

पावसाचा जोर वाढेना, तीन दिवसांपासून नुसती रिमझिम आणि ढगाळ वातावरण



बीड (रिपोर्टर)- एक महिन्यानंतर पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असला तरी पावसाचा जोर अद्यापही वाढलेला नाही. तिन दिवसांपासून नुसती रिमझिम आणि ढगाळ वातावरण आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन, मुग, उडीद, मका ही पिकं जवळपास पुर्णत: वायाला गेली. पाऊस सुरू झाला मात्र त्याला तितका अद्यापही जोर नसल्याने मोठ्या पावसाची शेतकर्‍यांकडून अपेक्षा केली जात आहे.


जुन महिन्यामध्ये चांगला पाऊस पडला त्यामुळे शेतकर्‍यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या. पेरण्यानंतरही पाऊस पडत गेला, पिकं चांगली आली, मध्येच पावसाने दडी मारल्याने जवळपास एक महिना पाऊस गायब होता. चार दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली असली तरी ही हजेरी दमदार नाही. तीन दिवसांपासून नुसतं ढगाळ वातावरण आहे. या ढगाळ वातावरणात रिमझिम पाऊस पडत आहे. या रिमझिम पावसामुळे खरीप पिकांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे. खरीप पिकं चांगली येण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. पावसाअभावी सोयाबीन, मूग, उडीद, मका इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आता चांगला पाऊस पडला तर कापूस, बाजरी, तूर, ऊस इत्यादी पिके चांगली येतील. दरम्यान गेल्या दोन दिवसामध्ये पडलेल्या पावसाची नोंद 2 मि.मी. इतका नोंदविण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!