Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमवाहनांना अडवून लुटणार्‍यांच्या महामार्ग पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वाहनांना अडवून लुटणार्‍यांच्या महामार्ग पोलिसांनी आवळल्या मुसक्या


बीड (रिपोर्टर)- भरदिवसा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रांजणीजवळ वाहनांना अडवून चालकांकडून बळजबरीने पैसे लुटले जात होते. याची माहिती महामार्ग पोलिस एपीआय प्रवीणकुमार बांगर यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला त्या ठिकाणी पाठवले असता पोलिसांनी दोघा जणांच्या मुसक्या बांधल्या असून पुढील कारवाईसाठी गेवराई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.


पाडळसिंगी टोलनाक्याच्या पुढे रांजणी फाट्याजवळ तिघे जण येणार्‍या-जाणार्‍या वाहनांना अडवून चालकांकडून बळजबरीने पैसे घेत होते. याची माहिती महामार्ग पोलिस एपीआय प्रवीणकुमार बांगर यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपले पथक रांजणी फाट्याजवळ पाठवले असता तिघेजण गाड्यांना अडवताना दिसले. पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या तर एक जण फरार झाला. पकडलेल्या आरोपींमध्ये विक्की दत्तात्रय आठरे (वय 28, रा. आसरानगर पाथर्डी), नितीन सुभाष जगताप (वय 27, रा. नवीन कावसान ता. पैठण जि. औरंगाबाद) या दोघांना ताब्यात घेतले तर गणेश भाबड (वय 25, रा. आगसखांड ता. पाथर्डी) हा फरार झाला आहे. पोलिसांनी दोघांकडून एक दुचाकी (क्र. एम.एच. 15 ईएल 8056) ताब्यात घेतली असून पुढील कारवाईसाठी गेवराई पोलिसांच्या स्वाधीन केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!