Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनासमाधानकारक : बीडमध्ये कोरोनाचा आकडा ७१ वर १५ जिल्ह्यात कोरोना रुग्ण शंभराच्या...

समाधानकारक : बीडमध्ये कोरोनाचा आकडा ७१ वर १५ जिल्ह्यात कोरोना रुग्ण शंभराच्या आत

बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात कमी झाल्याचे दिसून येत असून गेल्या दोन दिवसाच्या कालखंडात पंधरा जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा शंभरच्या आत आला असून आज बीड जिल्ह्यातही हा आकडा शंभरच्या आत ७१ वर येऊन पोहचल्याने काहीसे समाधान व्यक्त केले जात आहे तर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसंदर्भात राज्याचे आरोग्य विभाग सतर्क असले तरी काही एक्स्पर्टच्या मते सप्टेबर-ऑक्टोबर या महिन्यात येणारी तिसरी लाय ही जीवघेणी नसेल असे सांगण्यात येत आहे. राज्यातल्या मृत्यूदरावर चर्चा होत असताना धुळे, नंदूरबार, जळगाव, हिंगोली आणि गडचिरोली या जिल्ह्यात गेल्या महिनाभरात एकही मृत्यूची नोंद नाही.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असून राज्यातील उपचाराथीन रुग्णांची संख्या आता ५० हजाराच्या आसपास येऊन पोहचली आहे. १५ जिल्ह्यात शंभरपेक्षा कमी उपचाराधीन रुग्ण असून नंदुरबारमध्ये आज मितीला एकही रुग्ण नसल्याने रुग्णसंख्या नियंत्रणात दिसत असून नवबाधीत रुग्ण अद्याप पुर्णपणे संपलेले नसले तरी पंधरा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा हा शंभरच्या आत येताना दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नव्हती. गेल्या आठवडाभरात ही रुग्णसंख्या दिडशेच्या आत येत होती. आज मात्र ही रुग्णसंख्या शंभरच्या आत ७१ वर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. मात्र बाजारपेठा पुर्णत: उघडल्यामुळे आणि बाजारात होत असलेली गर्दी नागरिकांकडून कोरोना नियमांचे केले जाणारे उल्लंघन यामुळे कोरोनाची भीती अद्याप कायम आहे. कोरोनाची तिसरी लाट ही जीवघेणी नसेल असे काही अभ्यासकांचे मत आहे. मात्र अशा स्थितीतही राज्य शासन कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत सतर्क आहे.

Most Popular

error: Content is protected !!