Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमएटीएमची अदलाबदल करत ७२ हजाराची फसवणूक

एटीएमची अदलाबदल करत ७२ हजाराची फसवणूक


बीड (रिपोर्टर)- एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या दोघांना दोन भामट्यांनी गंडावत हातचलाखी करून एटीएमची अदलाबदल करत एका एटीएममधून २० हजार तर एका एटीएममधून ५२ हजार रुपये लंपास केल्याची घटना माजलगाव येथील सावजी बँक एटीएम येथे घडली असून या प्रकरणी माजलगाव शहर पोलिसात अज्ञात दोन भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


श्रीराम भीमराव चव्हाण (रा. मंजरथ रोड माजलगाव) व त्यांची पत्नी निलावती चव्हाण हे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एटीएम घेऊन सावजी बँक एटीएम येथे पैसे काढण्यासाठी गेले असता अज्ञात दोन भामट्यांनी हात चलाखी करून त्यांच्या एटीएमसारखेच दुसरे एटीएम त्यांना दिले व त्यांचे एटीएम घेऊन त्याद्वारे निलावती श्रीराम चव्हाण यांच्या एटीएम कार्डमधून ५२ हजार रुपये व नारायण पोहकर यांच्या एटीएममधून २० हजार असे एकूण ७२ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात दोन चोरट्यांविरोधात माजलगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक थोटे हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!