Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडनगरपालिकेची घाण आम आदमी पार्टी साफ करते

नगरपालिकेची घाण आम आदमी पार्टी साफ करते


सोमेश्वर मंदिरासमोरील कचरा बाजुला हटवला
बीड (रिपोर्टर)-बीड नगरपाकिा शहर स्वच्छ करण्याचा वेळोवेळी दावा करत आहे मात्र नगरपालिका शहरातील कचरा गोळा करून बिंदुसरा नदीच्या पात्रासह इतर रस्त्यांच्या कडेला टाकून जास्तच घाण करत आहे. आज सकाळी आम आदमी पार्टीने सोमेश्वर मंदिरासमोरील रस्त्याच्या कडेला असलेली घाण बाजुला हटवून नगरपालिका प्रशासनाचा निषेध केला आहे. नगरपालिका स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च करते मग हे पैसे जातात कुठे? असा प्रश्‍न आम आदमी पार्टीने उपस्थित केला.


आम आदमी पार्टीच्या वतीने दर रविवारी शहरातील काही भागात जावून स्वच्छता केली जाते. नगरपालिका प्रशासन स्वच्छतेवर लाको रुपये खर्च करत आहे. हे पैसे नेमके जातात कुठे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. नगरपालिका शहरातील घाण बिंदुसरा नदीपात्र व रस्त्याच्या कडेला टाकत असल्याने अस्वच्छतेत अधिकच भर पडू लागली आहे. सोमेश्वर मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकण्यात आला. हा कचरा आम आदमी पार्टीने बाजुला हटवत नगरपालिका प्रशासनाचा निषेध केला. या वेळी जिल्हाध्यक्ष अशोक येडे, शहराध्यक्ष सय्यद सादेक, रामजाने जमाले, ज्ञानेश्‍वर राऊत, रामभाऊ शेरकर, अभिषेक टाळके यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!