Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडशिरूरश्री क्षेत्र नागनाथ मानूर येथील तिसर्‍या श्रावणी सोमवारची कावड यात्रा रद्द

श्री क्षेत्र नागनाथ मानूर येथील तिसर्‍या श्रावणी सोमवारची कावड यात्रा रद्द


मानुर (रिपोर्टर)- शिरूर (कासार) तालुक्यातील मानूर येथील श्री तीर्थक्षेत्र नागनाथ देवस्थानची यात्रा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली आहे. तीर्थक्षेत्र मानूर मठाचे मठाधिपती श्री ष ब्र १०८ गुरू विरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज व मानूर ग्रामस्थ यांनी चर्चा करून प्रशासनास सहकार्य करण्याच्या हेतूने दि.२३ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यात तिसर्‍या सोमवारची पारंपारिक ऐतिहासिक कावड यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.\


त्यामुळे देवस्थानचे शिष्य व सदभक्त मंडळींनी मानूरला न येता घरामध्येच पूजा करून देवस्थानला व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मानूरकर महाराज यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या सूचनेवरून राज्यातील देवस्थाने पुर्णपणे बंद आहेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार देवस्थान बंद असल्याने पारंपरिक यात्रा घेण्यात येणार नाही. तिसर्‍या श्रावणी सोमवारी फक्त मानूरकर महाराज हेच फक्त धार्मिक विधी संपन्न करतील.त्यामुळे भाविक भक्तांनी व नागरिकांनी प्रशासनास, ग्रामस्थ व देवस्थानास सहकार्य करावे असे आवाहन मानूर मठाच्या वतीने मठाधिपती श्री ष ब्र १०८ गुरू विरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज व मानूर ग्रामस्थ यांनी केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!