Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमवकीलाला मारहान करून गळ्यातील सोन्याची चैन पळवली

वकीलाला मारहान करून गळ्यातील सोन्याची चैन पळवली

गेराई ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा
गेवराई (रिपोर्टर ) शहरातील गणेश नगर येथील रहिवासी असलेल्या एका वकीलाला घरात घुसून तीन ते चार बांधकाम व्यावसाईकांनी मारहान करत गळ्यातील सोन्याची चैन पळवली असल्याची घटना रात्री ६ च्या सुमारास घडली असुन या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात चौघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि शहरातील गणेश नगर भागात राहणारे ऍड सोपान मडके यांचे घरांचे बांधकामाचे काम मला का ? दिले नाही म्हणुन एका बांधकाम व्यावसायाकांने त्यांच्या घरात घुसून लाकडी दांड्याने मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन पळवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित वकीलाच्या फिर्यादीवरून शेख मोईन शेख राजू व अन्य अन ओळखी तिघांजनाविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!