Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीड‘आम्ही ज्वेलर्स आहोत, बीआयएसचे कारकून नाही’ म्हणत सराफा व्यापार्‍यांचा एकदिवसीय लाक्षणिक संप

‘आम्ही ज्वेलर्स आहोत, बीआयएसचे कारकून नाही’ म्हणत सराफा व्यापार्‍यांचा एकदिवसीय लाक्षणिक संप

बीड (रिपोर्टर)- अव्यवहारीक पद्धतीने लागू केलेल्या हॉलमार्किंग प्रक्रियेविरोधात ज्वेलर्स व सराफा व्यवसायिकांनी आज एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. अवघ्या महाराष्ट्रातील सराफा दुकानदारांनी आजच्या या संपामध्ये सहभाग घेतला. बीड येथील सर्व सराफा व्यापारी आजच्या या आंदोलनात सहभागी झाले होते. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


हॉलमार्किंग प्रक्रियेचा सराफा संघटनेच्या वतीने निषेध केला जात आहे. या विरोधात संघटनेने आवाज उठवत महाराष्ट्र बंदची हाक दिली. आज राज्यभरातील सर्व व्यापार्‍यांनी एकदिवसीय लाक्षणीक बंद पुकारला. या बंदमध्ये बीड येथील सराफा व्यापारी सहभागी झाले होते. संघटनेच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी अध्यक्ष मंगेश लोळगे, सचिव हिम्मत बेदरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!