Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडउपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी ऑन द स्पॉट डंपिंग ग्राऊंडवरील कचर्‍याचा प्रश्‍न सोडवला

उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी ऑन द स्पॉट डंपिंग ग्राऊंडवरील कचर्‍याचा प्रश्‍न सोडवला


बीड शहरात विविध भागात जमा होणारा कचरा डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. परंतू मागील काही दिवसापासून डंपींग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास अडचणी निर्माण झाल्याने शहरातील विविध भागात तसाच कचरा पडून होता. या बाबत नागरीकांकडून तक्रारी येवू लागल्याने उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर यांनी ऑन द स्पॉट डंपींग ग्राऊंडवर जावून सदर प्रश्न सोडवला आहे. शहरात विविध भागात साचलेला कचरा जमा करून डंपींग ग्राऊंडवर टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली असून बीड नगर पालिकेचा स्वच्छता विभाग कामाला लागला आहे.
बीड शहरातील विविध भागात जमा होणारा कचरा नाळवंडी नाक्याच्या पुढे डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. मागील काही दिवसापासून टाकण्यात येणारा कचरा बंद होता. त्यामुळे शहरातील विविध भागात कचरा तसाच पडून असल्याने त्याचा नागरीकांच्या जिविताला धोका निर्माण होवू शकतो ही बाब उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर यांच्या निदर्शनास आली. शहरातील नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता सभापती हेमंत क्षीरसागर यांनी नाळवंडी नाक्याच्या पुढे असलेल्या डंपींग ग्राऊंडवर जावून ऑन द स्पॉट सदर प्रश्न सोडवला. आता शहरात साचलेला कचरा डंपींग ग्राऊंडवर टाकण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे. उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या समवेत यावेळी स्वच्छता निरीक्षक चांदणे, नगरसेवक आमेर आण्णा, रईस भाई, जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हणकर, समीर तांबोळी व नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते आहे.

Most Popular

error: Content is protected !!