केज (रिपोर्टर): कर्तव्यावर असणार्या 23 वर्षीय जवानाला विजेचा शॉक लागल्याने यामध्ये ते शहीद झाले. या शहीद जवानाचे पार्थीव आज सकाळी केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे आणण्यात आले. या वेळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘अमर रहे… अमर रहे.. शहीद जवान उमेश मिसाळ अमर रहे’ अशा घोषणा देत त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला. या वेळी खा. प्रितम मुंडे यांच्यासह तहसीलदार यांची उपस्थिती होती.
केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील उमेश नरसू मिसाळ (वय 30 वर्षे) हा जवान राजस्थान राज्यातील सुरतगड येथे सैन्यदलामध्ये कार्यरत होता. सोमवारी सकाळी सात वाजता त्यास विजेचा शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या जवानाचे पार्थीव आज सकाळी कोल्हेवाडीत आणण्यात आला. शासकीय इतमामात जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी खा. प्रितमताई मुंडे, केजचे तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक पवार, मोराळे, अक्षय मुंदडा यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या अंत्यविधीला पंचक्रोशीतील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मिसाळ या जवानाच्या निधनाने तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे.