Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडबीडमध्ये राणेंच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड

बीडमध्ये राणेंच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड


बीड -केंद्रियमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कथित वक्तव्याचे पडसाद आज बीड मध्येही उमटले. उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी राणेंची प्रतिमा गाढवावर ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले आणि राणेंच्या प्रतिमेचे दहन करत राणेंविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, सागर बहीर यांनी थेट बीड शहर पोलीस ठाणे गाठले असून याठिकाणीही राणेंविरोधात गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात येते.


केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभर पडसाद उमटत असताना आज सकाळी बीडमध्येही शिवसैनिक आक्रमक झाले. नारायण राणेंच्या प्रतिमेला गाढवावर बसवून शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राणेंविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. राणेंचे वक्तव्य हे महाराष्ट्राचा अपमान करणारं असल्याचे सांगत शिवसैनिकांनी राणेंच्या प्रतिमेचे दहन केले. या वेळी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, सागर बहीर यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते. यानंतर उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर हे थेट बीड शहर पोलीस ठाण्यात गेले. त्याठिकाणी राणेंविरोधात फिर्याद दिली. दुपारी एक वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या वेळी सागर भैय्या बहिर युवा सेना जिल्हा प्रमुख पंजाब काकडे बीड तालुका संघटक शिव सेना ,अशोक पवार तालुका उप प्रमुख, अजिक्य पवळ , व्यंकटेश गुंदेकर, अशोक घोसीर , रमेश कदम ,बाळासाहेब वरेकर , समाधान हिगणे , किशोर काकडे, रामेश्वर वरेकर, रामहारी कुटे , अशोक बांडे , आशोक काकडे

Most Popular

error: Content is protected !!