Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीड४८ तासात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू , जिल्ह्याची मृत्यू सरासरी पावणे तीन टक्यांवर,...

४८ तासात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू , जिल्ह्याची मृत्यू सरासरी पावणे तीन टक्यांवर, एकूण मृत्यू २६९८ आज ७८ बाधितांची नोंद


बीड (रिपोर्टर)- गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या एकीकडे कमी होत असताना दिसून येत असताना दुसरीकडे मृत्यू सरासरी मात्र पावणे तीन टक्क्यांपर्यंत जाऊन पोहचली आहे. गेल्या ४८ तासात कोरोनामुळे चौघा जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या आता २ हजार ६९८ वर जाऊन पोहचली आहे. आज जिल्ह्यामध्ये ४ हजार ३१२ संशयितांच्या चाचण्या केल्या असता त्यामध्ये केवळ ७८ बाधित आढळून आले आहेत.


कधीकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या बीड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. ही जिल्हावासियांसाठी समाधानाची बाब असताना मृत्यू रेट मात्र कमी होताना दिसून येत नाही. सरासरीनुसार बीड जिल्ह्याचा मृत्यू रेट हा पावणे तीन टक्क्यांपर्यंत जाऊन पोहचला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ६९८ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ४८ तासांमध्ये बीड जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात ११०० पेक्षा अधिक रुग्ण आजही उपचार घेत आहेत. कोरोनाला अटकाव करण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावर प्रयतनांची पराकाष्ठा केली जात असून आज ४ हजार ३१२ संशयितांची चाचणी केली असता त्यामद्यङे ७८ जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये आष्टी ३३, बीड १२, धारूर ६, गेवराई १, केज ४, माजलगाव २, पाटोदा ६, शिरूर ६ आणि वडवणी तालुक्यात ८ बाधितांचा समावेश आहे.

Most Popular

error: Content is protected !!