Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeकरिअरजे.के. कुटुंबियातील अम्मार जगात तिसरा भारतात पहिला

जे.के. कुटुंबियातील अम्मार जगात तिसरा भारतात पहिला

बीड (रिपोर्टर)- येथील उद्योजक अब्दुल जमील ऊर्फ जे.के. यांच्या नातूने नुकत्याच झालेल्या गणितच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून जिल्ह्याचेच नव्हे तर भारताचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे. येथील राबिया बशीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गणितची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जे.के. कुटुंबियातील मोमीन अम्मार अब्दुल मुदस्सीर या सात वर्षीय मुलाने वर्ल्ड अबॅकस चॅम्पियन येथे जागतिक पातळीवर तिसरा क्रमांक पटकावला असून भारतात एक नंबरवर अम्मारने आपले नाव कोरले आहे.

येथील उद्योजक अब्दुल जमील यांचे नातू व अब्दुल मुदस्सीर यांचा सात वर्षीय मुलगा हा ऍडम्स शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत आहे. शिक्षणादरम्यान कोचिंग क्लासेसच्या माध्यमाने त्याची गणित परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. यात अम्मार याने जगात तिसरा क्रमांक पटकावला. या संदर्भात निकाल जाहीर होताच जिल्हाभरातून जेके कुटुंबियावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. तसेच रविवारी येथील ताज फंक्शन हॉलमध्ये राबिया बशीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अम्मार याचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. योगेश क्षीरसागर, सिद्दीकी नवीद, सिराज देशमुख, डॉ. सुरेश मुंडे, डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, खाजा मोईनोद्दीन, उद्योजक मुदस्सीर सेठ, अब्दुल सलाम, अब्दुल सलीम, अब्दुल बारी, अब्दुल हमीद, अब्दुल मुजीब यांच्यासह कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. जेके कुटुंबियातील अम्मार याने बीड जिल्ह्याचेच नव्हे तर देशाचे नाव जगाच्या पातळीवर आणले. यासंदर्भात जिल्हाभरातून अम्मार याचे अभिनंदन होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!