Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमलॉकेट चोराच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

लॉकेट चोराच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या


बीड (रिपोर्टर)- देव दर्शनासाठी गेलेल्या एका इसमाच्या गळ्यातील लॉकेट चोरून फरार झालेल्या चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या असून त्याचे अन्य दोन साथीदार मात्र फरार आहेत.

उत्तरेश्वर पिंप्री येथे देव दर्शनासाठी बाबासाहेब राम बिक्कड (रा. नाहोली) हे परवा दर्शनासाठी गेले होते. या वेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात तिघा जणांनी त्यांना धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचं सोन्याचं लॉकेट चोरून पळ काढला होता. त्यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील एका आरोपीच्या दुसर्‍याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय भगत दुल्लत यांनी मुसक्या आवळल्या. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव जाधव (रा. गांधीनगर, बीड) असे असून त्याचे अन्य दोन साथीदार फरार आहेत. त्यांनी चोरलेले लॉकेट हे दुसर्‍या साथीदाराकडे असल्याचे पोलिसांना त्याने सांगितले असून त्या दोन चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत. जाधव याच्याकडून एक दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!