बीड (रिपोर्टर)बिंदुसरा नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलावर पाणी साचत आहे. या पाण्यातून मोठे वाहन गेल्यानंतर दुचाकीस्वारांच्या अंगावर पाणी उडते. यामुळे दुचाकीस्वार रात्री-अपरात्री घसरल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी जाण्याचे पाईप रिकामे करावेत, अशी मागणी होत आहे.
बिंदुसरा नदी पात्रावरील बार्शी नाक्यावरील पुल गेल्या कित्येक वर्षानंतर झाला. मात्र सध्या या पुलावरील पाणी जाण्यासाठी जे पाईप टाकण्यात आले आहे ते मातीमुळे पुर्णत: बुझले आहेत. त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी या पुलावर पाणी साचते. मोठे वाहन या पुलावरून गेल्यानंतर दुचाकीस्वारांच्या अंगावर पाणी उडल्याने दुचाकी घसरते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. रात्री पाण्याचा अंदाज न आल्याने वाहने सुसाट जातात, पाण्याचा निचरा होण्यासाठी टाकलेले पाईप मोकळे करावेत, अशी मागणी होत आहे.