Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडया जन्मी तरी ऋणातून मुक्त होणे अशक्य मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध -आ.संदीप क्षीरसागर

या जन्मी तरी ऋणातून मुक्त होणे अशक्य मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध -आ.संदीप क्षीरसागर

वाढदिवसादिवशी आ. क्षीरसागरांनी घेतले देवस्थानांचे दर्शन
शहेंशाहवली दर्ग्यात चढविली चादर
नारायणगड
भगवानबाबांचे घेतले आशीर्वाद
ठिकठिकाणी आमदार क्षीरसागरांचे औक्षण

बीड (रिपोर्टर)- बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा आणि ज्येष्ठांनी आशीर्वाद दिल्यानंतर संदीप क्षीरसागरांनी ‘तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या, या जन्मी तरी ऋणातून मुक्त होणे अशक्य’ असल्याची भावना व्यक्त करत बीड मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.


आज सकाळी संदीप क्षीरसागरांनी सर्वप्रथम नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेतले. या वेळी गावातील महिलांनी औक्षण केले. आपल्या जन्मगावचे प्रेम, आशीर्वाद घेत संदीप क्षीरसागर धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायण-गडावर गेले. नारायणगडचे आशीर्वाद प्राप्त करून संदीप क्षीरसागरांनी शहेंशाहवली दर्गा येथे जावून चादर चढविली, कंकालेश्वरचे दर्शन घेत संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होत आ. क्षीरसागरांनी मोमीनपुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडी, आयपीडी व प्रसुतीगृहाच्या सुसज्ज रुग्णालयाचे आज उद्घाटन केले. यामुळे या भागातील रुग्णांना व महिलांना प्रसूतीसाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही. या वेळी आ. क्षीरसागरांनी आज सकाळपासून मतदारसंघातले मतदार मायबाप आवर्जून फोन करून शुभेच्छा देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या, या जन्मी तरी तुमच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य असल्याचे सांगत मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत विकास नेण्यासाठी, गावागावातल्या योजना राबविण्यासाठी आपण सातत्याने सरकार दरबारी प्रयत्नशील असून पक्षही आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. अनेक मोठमोठे कामे वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. यापुढेही असेच विकास कामे होत राहतील. हे सर्व तुम्हा सर्वांच्या प्रेम आशीर्वादाच्या बळावरच होत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!