Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडनिष्ठावंत,दिलदार व्यक्तीमत्वाच्या गळ्यात काँग्रेस पक्षाची माळ राजेसाहेब देशमुख यांची अध्यक्षपदी निवड

निष्ठावंत,दिलदार व्यक्तीमत्वाच्या गळ्यात काँग्रेस पक्षाची माळ राजेसाहेब देशमुख यांची अध्यक्षपदी निवड

देशमुख यांच्या निवडीने जिल्हा काँग्रेसला बळ मिळणार
बीड (रिपोर्टर):- जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची निवड होते याकडे जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते. सर्वांना सोबत घेवून चालणारे राजेसाहेब देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने एक चांगला खमक्या जिल्हाध्यक्ष पक्षाला मिळाला असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे. राजेसाहेब देशमुख यांच्यामुळे पक्षाला बळकटी मिळणार आहे. ते गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात सक्रीय आहे. देशमुख यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान देशमुख निष्ठावंत आणि दिलदार व्यक्तीमत्व असून त्यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पक्षाने टाकून त्यांना न्याय दिला आहे.


राजेसाहेब देशमुख हे अंबाजोगाई तालुक्यातील मुळचे माखेगाव येथील असून ममदापुर पाटोदा गटाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. ते शिक्षण आणि आरोग्य सभापती होते. त्यांनी पंचायत समितीसह तालुका पातळीवर संघटनात्मक पदावर काम केलेले आहे. काँग्रेसला एक खमके नेतृत्व लाभले असल्याचे प्रतिक्रिया पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. देशमुख यांच्या निवडीने माजी मंत्री अशोक पाटील, माजी खा.रजनीताई पाटील, राहुल सोनवणे, पशुपतीनाथ दांगड यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे. देशमुख हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात सक्रीय आहेत. त्यांचा जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क आहे. देशमुख यांच्यामुळे काँग्रेस पक्षाला नक्कीच बळकटी येवू शकेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पाहता देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. देशमुख हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे राजकारणी आहेत. अंबाजोगाई परळी या तालुक्यामध्ये त्यांचा चांगलाच दबदबा असल्याने याचा फायदा काँग्रेस पक्षाला नक्कीच होणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!