Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमअंथरवणपिंप्रीत दोन गट आमने-सामने पिस्टल बाळगणार्‍या तरुणाला पिंपळनेर पोलीसांनी घेतले ताब्यात

अंथरवणपिंप्रीत दोन गट आमने-सामने पिस्टल बाळगणार्‍या तरुणाला पिंपळनेर पोलीसांनी घेतले ताब्यात

बीड (रिपोर्टर):-सावता माळी चौकात किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर अंथरवणपिंप्री तांडा येथे आज सकाळी दोन गट आमने सामने आले, यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना गंभीर मारहाण करण्यात आली. यावेळी घटनास्थळी पोलीस पोहचल्याने प्रकरण तात्काळ मिटले. एकाजणाने हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात येते मात्र या घटनेला पोलीसांनी दुजोरा दिला नाही पण अवैध पिस्टल बाळगणार्‍या एका तरुणाला पिंपळनेर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सावता माळी चौकातील प्लायवूडच्या दुकानात कामाला असलेल्या एका मुलाचे काल किरकोळ भांडण झाले होते. त्यानंतर आज सकाळी अंथरवणपिंप्री येथील तांड्यावर दोन गट आमने सामने आले. दोघांनीही एकमेकांना गंभीर मारहाण केली. यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. जखमींना बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. भांडण सुरू असतांना त्या ठिकाणी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय बाळासाहेब आघाव आणि पीएसआय ढाकणे हे घटनास्थळी पोहचल्याने हे प्रकरण तेवढ्यावरच मिटले. त्यानंतर पोलीसांनी वाघमारे नामक एका तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे एक पिस्टल मिळून आली. घटनास्थळी त्याने हवेत गोळीबार केला असल्याचे नागरीकातून सांगण्यात आले मात्र या घटनेला पोलीसांनी दुजोरा दिला नाही. ताब्यात घेतलेला युवक हा एमआयडी बीड भागातील असल्याचे बोलले जाते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!