Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमपरळी रोडवर अपघात, तरुण ठार

परळी रोडवर अपघात, तरुण ठार


आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांचा ठाण्यासमोर ठिय्या
परळी (रिपोर्टर)- परळीहून पांगरीकडे निघालेल्या एका मोटारसायकल स्वारास कारने जोराची धडक दिली . यामध्ये तरुण गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाला. ही घटना परळी ते तळेगाव रस्त्यावर घडली. या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मयताचे नातेवाईक ग्रामीण पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले होते.


प्रमोदय भगवान तांदळे (रा. सारडगाव ता. परळी) हा तरुण मोटारसायकलवरून परळीहून पांगरीकडे जात होता. त्यास तळेगाव जवळ एका कारने जोराची धडक दिल्याने यात तो गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाला. ही घटना रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी अद्यापही कार चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला नसल्याने मयताचे नातेवाईक गुन्हा दाखल करण्यासाठी परळी ग्रामीण ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले होते.

Most Popular

error: Content is protected !!