Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडजिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार

जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार

नद्या-नाल्यांना पूर, गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा , हजारो हेक्टर शेतात पाणी घुसले, काढणीला आलेले सोयाबीन, मूग, उडीद वाहून गेले; उसाचं क्षेत्र बाधित, अनेक छोटे-मोठे तलाव ओसंडून वाहू लागले, गेवराई तालुक्यातील राहीतळ गावात पाणी घुसले, माजलगाव-बीड रस्त्यावरील पिंपळनेर नजीकचे दोन पुल वाहून गेले; अनेक ठिकाणी घरांची पडझड
बीड/गेवराई (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यातील काही महसूल क्षेत्रात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदी, नाले ओसंडून वाहत त्यातील पाणी शेतात घुसल्याने जिल्ह्यातील बहुतांशी भागातील शेती वाहून गेली. पिके उद्ध्वस्त झाली असून रस्त्यांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. गेवराई तालुक्यातील तलवाडा, राहीरी, राजापूर परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले तर लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे रोहीतळ अर्धेगाव पाण्यात गेले. भाटसांगवी-राक्षसभुवन हा पुल वाहून गेला असून बीड तालुक्यातील पिंपळनेर सर्कलमध्ये 200 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतात पाणी घुसून शेकडो हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे. बीड-माजलगाव रस्त्यावरील पिंपळनेर नजीकचे दोन पुल वाहून गेले आहेत. इकडे वडवणी तालुक्यातही पावसाने हाहाकार माजवल्याचे वृत्त येत आहे. धारूर, परळी, अंबाजोगाई, माजलगाव परिसरातही मोठा पाऊस झाला. इकडे आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात शंभर मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद आहे.

pimpalner1
पिंपळनेर


बीड तालुक्यातील पिंपळनेर महसूल मंडळात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्0याने नदी-नाल्या एक झाले. नद्यांवर बांधलेल्या बंधार्‍याच्या बाजुने पाणी बाहेर पडल्याने ते पाणी शेतात घुसले. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती वाहून गेली. बीड-माजलगाव रस्त्यावरील पिंपळनेर नजीकचे दोन पुल रात्रीच्या पावसात वाहून गेले.

pimpalner
पिंपळनेर

पिंपळनेर, अंबेसावळी, मन्यारवाडी, मुगगाव, लिंबारुई, पिंपळादेवीसह आदी गावांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतातले उभे पिक अक्षरश: उद्ध्वस्त झाले.

माजलगाव, मांजरा, बिंदुसरा धरणात पाणीसाठा वाढला
बीड – रात्री जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने नद्या-नाल्यांना पूर आला. बीड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या माजलगाव धरणामध्ये पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ जाली. पाण्याचा ओघ सुरुच होता. बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या बिंदुसरा धरणातही पाणी वाढले असून जवळपास 60 टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा जमा झाला आहे. केज तालुक्यातील मांजरा या धरणातही पाण्याची आवक वाढली असून यासह जिल्हाभरातील इतर छोट्या-मोठ्या धरणात पाणीपातळीत बर्‍यापैकी वाढ झाली आहे.

Most Popular

error: Content is protected !!