12 तासांच्या अथक परिश्रमाने मृतदेह काढण्यात यश
आष्टी (रिपोर्टर):- तालुक्यातील आंधळेवाडी येथील 5 वर्षीय चिमुकल्याचा सोमवार दि.10 जुलै रोजी दुपारी 3 च्या सुमारास विहरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.माऊली निकाजी काळे असे दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे.विहरीत पाणी जास्त असल्याने मोटार च्या साहाय्याने पाणी उपसून आज सकाळी पहाटे 4 वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तालुक्यातील आंधळेवाडी परिसरातील निकाजी काळे यांची वस्ती असून घरापासून काही अंतरावर असलेल्या विहरीजवळ माऊली निकाजी काळे वय वर्ष 5 असे चिमुकला खेळत गेला असता विहिरीत पडला हि घटना दि.10 जुलै रोजी दुपारी 4 च्या सुमारास घडली विहिरीत पडल्याचे कळताच नागरीकांनी व पोलिसांनी पाणी उपसण्यासाठी सुरुवात केली पहाटे 4 वाजता मृतदेह बाहेर काढून आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन अंत्यविधी करण्यात आला. माहिती कळताच घटनास्थळी पोलिस संतोष दराडे, पो.ह.नवनाथ काळे यांनी पोहचून मदत केली.