Tuesday, January 25, 2022
No menu items!
HomeUncategorizedगेवराई पोलीसांनी एका आरोपीसह नऊ दुचाकी केल्या जप्त

गेवराई पोलीसांनी एका आरोपीसह नऊ दुचाकी केल्या जप्त


गेवराई (रिपोर्टर):- अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे लक्षात घेता बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात डीबी पथकाची स्थापना केली आहे. यामध्ये गेवराई पोलीसांना यश आले असुन डीबी पथक प्रमूख एपीआय प्रफुल्ल साबळे यांनी एका चोरट्याच्या मसक्या आवळल्या आसून त्याच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी करण्यात आलेल्या नऊ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

किरण तात्यासाहेब कोल्हारे (वय 26 वर्ष) रा.भांबेरी ता.अंबड जि.जालना ह.मु.देवपिंप्री ता. गेवराई जि.बीड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेवराई तालुक्यात व शहरात मोटारसायकल चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या मात्र आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक वेगवेगळ्या दिशेने तपास केला तरीही या आरोपीचा शोध लागत नव्हता. मात्र तपासा दरम्यान गस्त घालत असताना एका खबर्‍याच्या माहितीवरून एक व्यक्ती यांच्याकडे चोरीच्या मोटार सायकल आहेत. अशी माहिती गेवराई पोलीस ठाण्यातील डीबी पथक प्रफूल्ल साबळे यांना मिळाली यानंतर लगेच त्यांनी आपल्या टीमला सोबत घेऊन उमापूर परिसरातून या आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले व चौकशी दरम्यान आपण मोटरसायल चोरतो अशी कबूली आरोपी देत त्यांच्याकडे नऊ वेगवेगळ्या कंपनीच्या मोटार सायकल मिळून आल्या असून अंदाजे चार लाखं रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा व पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख एपीआय प्रफुल्ल साबळे,स.फौ.उबाळे, पो.हे.कॉ.देशमुख, पो.कॉ.जायभाये पो.कॉ.काळे यांनी केली असुन या घटनेचा अधिक तपास हे पथक करीत आहे.

Most Popular

error: Content is protected !!