Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडसापडलेले दहा हजार इमाने इतबारे परत केले

सापडलेले दहा हजार इमाने इतबारे परत केले

बीड (रिपोर्टर)ः- शहरातील एका एटीएमजवळ तरुणास पाकीट सापडले होते. त्या पाकीटात नगदी दहा हजार रुपये होते. तरुणाने सापडलेले पाकीट शिवाजी नगर पोलीसांच्या स्वाधीन केले. पोलीसांनी ओळख पटवून संबधीत व्यक्तीला ते पाकीट परत केले. तरुणाच्या या इमानदारीबद्दल कौतुक केले जात आहे.


दत्तराज दिपक गुंजाळ या तरुणाला सकाळी एटीएम जवळ पाकीट सापडले होते. सदरील या पाकीटात नगदी दहा हजार रुपये होते. हे पाकीट तरुणाने शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे प्रमुख साईनाथ ठोंबरे यांच्याकडे दिले. सदरील हे पाकीट सुनील ज्ञानोबा जोगदंड यांचे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून हे परत देण्यात आले. तरुणाच्या या इमानदारीबद्दल त्याचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!