Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनाआष्टीत संसर्ग वाढला

आष्टीत संसर्ग वाढला


बीड (रिपोर्टर)ः- गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णाची संख्या शंभरच्या खाली आहे. मात्र आष्टी तालुक्यातील संसर्ग आरोग्य विभागाला आटोक्यात येत नाहीत. इतर तालुक्यात मात्र दहाच्या खाली रुग्ण आढळून येत आहे. आजच्या अहवालात एकट्या आष्टी तालुक्यात 27 रुग्ण तर जिल्हात 67 जण बाधीत आढळून आले आहे.
आरोग्य विभागाला आज 3388 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्यामध्ये 67 जण बाधीत तर 3321 जण निगेटिव्ह आढळून आले आहे. पॉझिटिव्ह मध्ये अंबाजोगाई-4, आष्टी-27, बीड-14, धारुर-4, केज-4, माजलगांव-2, पाटोदा-5, शिरुर-1, आणि वडवणी तालुक्यात 6 रुग्ण आढळून आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!