Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडगुड न्यूज! जिल्हा रुग्णालयात ओपीडी सुरू

गुड न्यूज! जिल्हा रुग्णालयात ओपीडी सुरू

कोरोनामुळे हलवलेले जिल्हा रुग्णालयाचे संपूर्ण कामकाज पुन्हा मूळ जागेवर, शहराबाहेर रुग्णालय
गेल्यानंतर रुग्णांचे होत होते हाल, कोरोना कमी होताच जिल्हा रुग्णालयात केली सर्व रुग्णांची व्यवस्था
बीड (रिपोर्टर)- कोरोनाचा संसर्ग पहाता जिल्हा रुग्णालय तात्पुरते आदित्य डेंटल महाविद्यालयामध्ये हलविण्यात आले होते. तब्बल अडीच वर्षे झाले रुग्णालय डेंटल महाविद्यालयात होते. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे अदित्य डेंटलमधील रुग्णालय पुन्हा जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले. आजपासून हे रुग्णालय पुर्ववत सुरू झाले. कोरोनाच्या रुग्णांसाठी चार वार्डांची निर्मिती रुग्णालयामध्येच करण्यात आली. इतर सर्व रुग्णांवर जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्येच उपचार होणार आहेत. रुग्णालय पुर्ववत आल्याने रुग्णांची गैरसोय थांबणार आहे.
अडीच वर्षांपुर्वी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. कोरोनाची परिस्थिती पाहता जिल्हा रुग्णालय नाळवंडी नाका येथे असलेल्या आदित्य डेंटल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. त्याठिकाणी सर्व व्यवस्ता रुग्णालय प्रशासनाने केली होती. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्याही शंभराच्या आत आली असून रुग्णालय प्रशासनाने डेंटल महाविद्यालयातील जिल्हा रुग्णालय पुन्हा पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातच नाळवंडी नाका परिसरामध्ये रुग्णालय असल्याने जिल्हाभरातील सर्वसामान्य रुग्णांना इतके लांब जाणे परवडत नव्हते. रुग्णालय हलविण्याची मागणी अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांसह विविध राजकीय नेत्यांनी केली होती. त्यानुसार रुग्णालय पुन्हा पुर्व जागेवर आणण्यात आले. आजपासून रुग्णालय सुरू झाले आहे. कोरोना रुग्णांसाठी वार्ड क्र. ६, ७, ८ आणि ९ हे चार वार्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. आज या वार्डांची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, आरएमओ राठोड, डॉ. शिंदे, मेटरन गिरी, गणेशसह आदींनी पाहणी केली. जिल्हा रुग्णालय पुन्हा पुर्व जागेवर आल्याने सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड थांबणार आहे.


कोरोना रुग्णांसाठी
आता चार वार्ड

जिल्हा रुग्णालयामध्ये ओपीडी पुर्ववत सुरू झाली असली तरी कोरोनाच्या रुग्णावर याच रुग्णालयात उपचार होत आहेत. यामध्ये वार्ड क्र. ६, ७, ८ आणि ९ हे चार वार्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर अपघात कक्ष वार्ड क्र. २३ मध्ये स्थापीत करण्यात आला आहे. वार्ड क्र. १७ मध्ये हाडाच्या रुग्णांवर उपचार होणार आहेत. ओपीडी आणि प्रसुतीसाठी वार्ड क्र. २ ची निर्मिती करण्यात आलेली आहे.

Most Popular

error: Content is protected !!