Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeराजकारणसहकारी बँका बंद पाडण्याचे आरबीआयचे धोरण ईडीबाबत संसदेत बोलू - शरद पवार

सहकारी बँका बंद पाडण्याचे आरबीआयचे धोरण ईडीबाबत संसदेत बोलू – शरद पवार


मुंबई (रिपोर्टर)- आरबीआयचे धोरण हे देशातील बँकांना उत्तेजित करणारं असावं, पण सामान्यांना अडचणीच्या वेळी उपयोगी पडणार्‍या नागरी बँका बंद करण्याचं नवं सूत्र आरबीआयने अवलंबलं असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली. त्या माध्यमातून देशातील सहकार संपवायचा आणि सामान्यांना आर्थिक अडचणीत आणायचं आरबीआयने भूमिका घेतली आहे का असा प्रश्न पडतोय असंही ते म्हणाले.
आरबीआयने नागरी बँकांच्या संबंधित घेतलेल्या भूमिकेला शरद पवारांनी कडाडून विरोध केला आहे. ते म्हणाले की,आरबीआयचं नवं धोरण हे नागरी बँकांच्या विरोधात आहे. सामान्य नागरिकाला अडचणीच्या वेळी हक्काने मदत करणार्‍या नागरी बँकांना अडचणीत आणणारं आहे. देशातील काही ठराविक बँकांना फायदेशीर असणारे रिझर्व्ह बँकेचं धोरण हे सहकार क्षेत्राला मारक आहेच, पण सामान्यांनाही आर्थिक अडचणीत आणणारं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आज आरबीआयचा सहकारी बँकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन योग्य नाही. सहकारी बँकेचा संचालक नेमण्याचा अधिकार आरबीआयने स्वत:कडे घेतला असून त्यामुळे काही विशिष्ट लोकांच्या हातात बँका देण्याचा प्रयत्न आहे. आरबीआयच्या या नव्या नियमांमुळे सहकार अडचणीत येत आहे. आणला जात आहे.
आपण सत्तेत असताना ९७ वी घटनादुरुस्ती मांडली असल्याचं सांगत शरद पवार म्हणाले की, राज्य सरकारला सहकारी बँकांना मदत करण्याचा अधिकार आहे. त्यावेळी राजकीय हेतूने होणार्‍या चौकशीपासून सहकारी बँकांची सुटका व्हावी म्हणून आपण सर्व सहकारी बँकांना अशा चौकशीपासून संरक्षण दिलं. पण आता आरबीआयच्या धोरणामुळे राज्याच्या अधिकारावर गदा येत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!