Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमकुंडलिका नदीतून शेतकरी वाहून गेला नागरिकांसह प्रशासन शोध घेत आहे

कुंडलिका नदीतून शेतकरी वाहून गेला नागरिकांसह प्रशासन शोध घेत आहे


वडवणी (रिपोर्टर)- दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने या पावसामुळे सर्वच नद्या-नाल्यांना पूर आला. कुंडलिका नदीलाही सध्या पाणी असल्याने या पाण्यातून 50 वर्षीय शेतकरी जात असताना सदरील शेतकरी वाहून गेला. या शेतकर्‍याचा शोध गावकरी आणि प्रशासन घेत आहे.


गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जिल्हाभरातील सर्वच नद्या ओसंडून वाहत आहेत. कुंडलिका नदीलाही आज सकाळी पुर आला होता. या पाण्यातून जात असताना राजेवाडी येथील सतीश पोटभरे हा 50 वर्षीय शेतकरी वाहून गेला. या घटनेची माहिती गावकर्‍यांना व प्रशासनाला झाल्यानंतर या शेतकर्‍याचा शोध सुरू होता.

Most Popular

error: Content is protected !!