Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeराजकारणमहेबुब शेख-चित्रा वाघ यांच्यातील शाब्दीक वाद शमेना

महेबुब शेख-चित्रा वाघ यांच्यातील शाब्दीक वाद शमेना


हिनवणं आमच्या बापाने शिकवलं नाही-चित्रा वाघ
आदाराने बोलणे ही आमच्या बापाची शिकवण-महेबुब शेख

बीड (रिपोर्टर):- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबुब शेख आणि भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील शब्दीक चकमक थांबायचे नाव घेत नसून आज चित्रा वाघ यांनी मी कुना परिवारातील सदस्याला बलात्कार्‍याची मुल म्हणून कधीही हिनवणार नाही, कारण आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही.

विरोधकाकडे मुद्दे संपले की तिच्या बाईलपणाला व तिच्या परिवाराल टार्गेट केलं जात असं ट्विट केल्यानंतर आज महेबुब शेख यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट करत राज्यातील निराधार लोकांच्या बदनामीच्या सुपार्‍या घेणार्‍या व्यक्तीला जी भाषा समजते त्याच भाषेत मी बोलत आहे. भाजपाच्या सुद्धा योग्य व मुद्देसुद बोलणार्‍या उमाताई, विजयाताई यांना आम्ही आदराणेच बोलतो हीच आमच्या बापाची शिकवण आहे असे उत्तर दिले.
पारनेरचे आ.निचलेश लंके यांच्यावर तहसीलदार ज्योती देवरा यंनी केलेल्या आरोपानंतर चित्रा वाघ यांनी देवरा यांना पाठींबा दिला होता. तसच निलेश लंके यांच्यावर आरेाप केले होते. तेंव्हा महेबुब शेख यांनी लंकेवरील आरोपांना उत्तर देतांना वाघ यांच्यावर सडकावून टिका केली होती. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेवून देतो असं म्हणाले होते. तेथून पुढे चित्रा वाघ यांनीही वाघावर कोल्हे, कुत्रे भुंकतात असे वक्तव्य केले होते. हा वाद आणि शाब्दीक चकमक दोघांमध्ये सुरू झाली ती थांबायचे नाव घेत नाही. आज पुन्हा चित्रा वाघ रांनी रा संदर्भात नवं ट्वीट केलं आहे. ’माझ्रा व माझ्रा कुटुंबाविरोधात गलिच्छ भाषा वापरली जात आहे. कोणीही काहीही म्हणालं तरी मी कुणाच्रा कुटुंबातील सदस्रांना बलात्कार्‍राची बारको किंवा बलात्कार्‍राची मुलं म्हणून कधीही हिणवणार नाही. कारण आमच्रा बापाने हे आम्हाला शिकवलं नाही,’ असा टोला वाघ रांनी मेहबूब शेख रांना हाणला आहे. ’विरोधकांकडील मुद्दे संपले की एखाद्या महिलेच्रा बाईपणाला व तिच्रा कुटुंबाला टार्गेट केलं जातं. पण मला हे करण्राची आवश्रकता नाही. माझ्राकडं सत्ताधार्‍रांना गुद्दे द्यारला बरेच मुद्दे आहेत, असं त्रा म्हणाल्रा. यावर महेबुब शेख यांनीही उत्तर दिले आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील नातेवाईकांकडून लाच घेणार्‍या व्यक्तीच्या मुलांना मी सुद्धा लाचखोर व्यक्तीचे मुल म्हणून हिणवणार नाही कारण ते निष्पाप मुलं. नाकाने वांग सोलत नाही की कोणाच्या सुपार्‍या घेवून टिका करत नाहीत. आई, बहिण, बायको आम्हाला सुद्धा आहेत आणि कसे वागायचे याचे संस्कार आम्हाला आहेत. तत्यहीन बलात्काराचे आरोप केल्याने कोणी बलात्कारी होत नाही. प्रत्येक वेळी बोलले की लाचखोर नवर्‍याची बायको बाईपण व कुटुंबाला समोर करते व इतरांवर तत्यहीन आरोप करते. त्यापेक्षा नवर्‍याने कशात लाच घेतली ते महाराष्ट्राला सांगावे व कसा लाचखोर नाही हे सुद्धा सांगावे. जवळचा नातेवाईक गेल्याच्यानंतर न्याय मागायला आलेल्या व्यक्तीकडून लाच खाणार्‍या सत्य घटनेवर बोललो तर इतके झोंबले. राज्यातील निरपराध लोकांच्या बदनामीच्या सुपार्‍या घेणार्‍या व्यक्तीला जी भाषा समजते त्याच भाषेत मी बोलत आहे. भाजपाच्या सुद्धा योग्य व मुद्देसुद बोलणार्‍या, उमाताई, विजयाताई यांना आम्ही आदरानेच बोलतो. हीच आमच्या बापाची शिकवण आहे असं उत्तर महेबुब शेख यांनी दिलं.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!