Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईनुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या व्यथा ऐकून आमदार झाले निशब्द

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या व्यथा ऐकून आमदार झाले निशब्द


4 किलोमीटर चिखल तुडवत आ.पवार यांनी केली भेंड येथील फुटलेल्या तलावाची व शेत नुकसानीची पाहणी
गेवराई (रिपोर्टर) चिखल आणि काट्याकुट्यांचा आणि दगडधोंड्यांचा रस्ता तुडवत आमदार पवार यांनी जवळपास चार किलोमीटर रस्ता कापत येथील भेंड खुर्द येथील फुटलेल्या तलावामुळे नुकसान झालेल्या आणि खरडून गेलेल्या शेतीची आमदार पवार यांनी शेतकर्‍यांसोबत पाहणी केली यावेळी शेतकर्‍यांनी आमदार पवार यांना आपल्या व्यथा मांडली असता आमदार पवार स्वतः निशब्द झाले.


दरम्यान आमदार पवार यांनी शेतीचे झालेले नुकसान अतिशय विदारक आहे आणि ते न भरून निघणार आहे काही शेती खरडून गेली आहे त्यामुळे शासनाने तातडीने या शेत जमिनीचे पंचनामे करावेत आणि तात्काळ मदत द्यावी यासाठी मी सरकारला भांडून पाठपुरावा करणार असल्याचा विश्‍वास आ.पवार यांनी शेतकर्‍यांना दिला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!