Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeकोरोनाअंबाजोगाई, माजलगाव, धारूर, परळी शुन्यावर बीड जिल्ह्यात 57 पॉझिटिव्ह

अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, परळी शुन्यावर बीड जिल्ह्यात 57 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर): गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होवू लागली आहे, ही शंभरच्या आत कायम आहे. काल बीड तालुक्यासह शहरात एकही रुग्ण नव्हता. आज आलेल्या अहवालात बीड तालुक्यात 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, परळी तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. तर जिल्ह्यात 57 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याने सध्या 680 एक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 98 हजार 298 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहेे तर 2725 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाला आज 2751 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 57 जण पॉझिटिव्ह आढळून आले असून 2694 जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्हमध्ये आष्टी 23, बीड 11, गेवराई 2, केज 8, पाटोदा 6, शिरूर 1 आणि वडवणी तालुक्यात 6 रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!