Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeसंपादकीयरोख ठोक- करूणा एक बहाना, धनंजय मुंडे निशाणा कंबराखालचा वार कोणाचा?

रोख ठोक- करूणा एक बहाना, धनंजय मुंडे निशाणा कंबराखालचा वार कोणाचा?

बाळासाहेबांच्या याच प्यार किया तो डरना क्या हे वाक्य तेंव्हा आत्मबळ देणारं ठरलं होतं. आत्मविश्‍वास वाढवणारं होतं, त्याच आत्मविश्‍वासाने महाराष्ट्राला सामोरं जाण्याचं हिंम्मत देणारं हेातं. ते वाक्य महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेणारं ठरलं, ते वाक्य महाराष्ट्राचं नेतृत्व करणारं ठरलं, तेच वाक्य समाजाला एकवटणारं ठरलं, त्याच वाक्याने महाराष्ट्राबरोबर देशाचं नेतृत्व करण्याचं आत्मबळ मिळालं, तेच वाक्य केंद्रात मंत्री पद मिळेपर्यंत सार्थकी ठरलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या प्यार किया तो डरना क्या या वाक्याने इतिहास घडवला असेल तर तुम लाख कोशीश करलो मुझे बदनाम करने की, मैं जब-जब बिखरा हूं दुगनी रफ्तारसे निखरा हूं हे धनंजय मुंडे यांचं वाक्य त्यांना अशा ‘करूणा’कराच्या कोरोना संसर्गातून का बाहेर काढणार नाही? आणि ‘करूणा’कराच्या कोरोना संसर्गाने परळी कलंकीत होईल?

rok thok

गणेश सावंत

राज्याच्या राजकारणाचा सातत्याने केंद्रबिंंदू ठरलेल्या बीड जिल्ह्याच्या नेतृत्वाला कायम पाण्यात पाहण्याचे धोरण नेहमीच आखले जाते. गेल्या चार-पाच दशकापासून बीड जिल्ह्याला महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्या साधारण महत्त्व आहे. राज्याच्या राजकीय सारीपाटावर चांगले अथवा वाईट घटना घडो त्या घटनेचे धागेदोरे कोठुण ना कोठुण बीड जिल्ह्यात असतात. यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. सक्रीय राजकारण करतांना समाजकारणाला आणि समाज व्यवस्थेला इथल्या मातीतला नेता महत्त्व देतो. म्हणूनच त्या नेत्याला अवघा महाराष्ट्र स्विकारतो. हे उघड सत्य नाकारता येणारं नाही. या आधी बीड जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे स्व.गोपीनाथ मुंडे यांनाही महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनेकांनी अनेक वेळा त्रासले. मुंडे हातात येत नाहीत म्हणून अनेक वेळा विरोधकांनी कंबरेचे काढुन डोक्याला बांधले तरीही मुंडेंचा अश्‍व उधळत राहिला आणि रेस जिंकत राहिला. त्याच मुंडेंच्या करंगळीला धरून राजकारणात आलेले धनंजय मुंडे हे जेंव्हा महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर एक महत्त्त्वाचं स्थान मिळवत आहेत. महाराष्ट्राच्या आठरापगड जातीजमातीच्या लोकांना सोबत घेवून जात आहेत हे जेंव्हा विरोधकांच्या लक्षात आलं तेंव्हा धनंजय मुंडे आपल्यासाठी अवजड होतोय की काय? या भितीतून धनंजय मुंडेंना चारीमुंड्या चित करण्याहेतू गेल्या दीड दशकात प्रयत्नांची परिकाष्टा विरोधकांकडून झाली. मात्र या सर्व विरोधकांच्या छक्क्या पंज्यांना हा सुर्य आणि हा जयजरथ दाखवत दुधाचं दुध आणि पाण्याचं पाणी करण्याचा धाडस प्रत्येक वेळा धनंजय मुंडेंनी करून दाखवलं. धनंजय मुंडे आपल्या रिंगणात येत नाहीत, ते आपल्याला सापडत नाहीत तेंव्हा विरोधकांनी ‘करूणा’करा कुठयस र तू? असं म्हणत आवयी दिली. त्या आवयीला साथ दिली जात असल्याचं पाहून धनंजय मुंडेंनी आपली
खुली किताब
महाराष्ट्रासमोर मांडली. होय, करूणा शर्मा या आपल्यासोबत होत्या, त्यांच्या मुलाला आपण नाव दिलं आहे. याबाबतचे प्रकरण न्याय  प्रविष्ट असल्याचे सांगून मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्याचवेळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धनंजय मुंडे हे एक बलाढ्य नेतृत्व होत होतं. पाच वर्षे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते पद तेवढ्याच ताकदीने सांभाळून महाराष्ट्राच्या आठरापगड जातींना न्याय देत आपलं कर्तृत्व उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं. ज्याच्यासाठी उभं आयुष्य खर्च केलं तिथच घात झाला. म्हणून आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतांना धनंजय मुंडेंनी जो संघर्ष केला तो आप्तस्वयिकांसह धनंजय मुंडेंच्या विरोधकांना अधिकच खुपत चलला. समाजात धनंजय यांची प्रतिमा खलनायक निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र इथही ते जमलं नाही. म्हणूनच तथाकथीत ‘करूणा’कराची याचना करण्यात आली अन् धनंजय मुंडेंच्या चारित्र्याला हात घालण्याचा प्रयत्न झाला. यातून बरच काही वादळ उठेल, धनंजय मुंडे आयुष्यातून उठेल असे अनेकांना वाटले. त्यासाठी त्यांनी अक्षरश: देवपाण्यात ठेवले परंतू तिथही धनंजय मुंडेंनी बाजी मारली. न्यायालयाने तथाकथीत ‘करूणा’कराला धनंजय मुंडे यांच्या बाबत बोलतांना अनेक अटी घातल्या. इथं हा विषय संपेल असे वाटत असतांनाच
‘करूणा’कराचा टाहो कोरोनासारखा
धनंजय मुंडेंसाठी संसर्ग वाढवणारा ठरू लागला. करूणा शर्मा कधी सोशल मिडियावर पोस्ट टाकून तर कधी लाईव्ह येत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत राहिल्या, मगरीचे आश्रु ढाळत राहिल्या, स्वत:वर किती अन्याय झाला, धनंजय मुंडे किती दोषी हे महाराष्ट्राला सांगत राहिल्या. परंतू त्यांच्या प्रत्येक बोलण्यातून त्यांच्या प्रत्येक वाक्यातून, देहबोलीतून, त्या पिडित आहेतच का? हा प्रश्‍न सातत्याने उपस्थित होत गेला. परंतू जेंव्हा त्या परळीत आल्या, अनेक नाट्यमय घडामोडीत त्यांची जी अ‍ॅडिओ क्लिप लोकांना ऐकायला मिळाली, त्या अ‍ॅडिओ क्लिपने करूणांची करून कहाणी ही ब्लॅकमेलींगची चाचणी ठरली. हमे तो बस वहाँ रायता फैलाना हैं, जादे से जादे पैसे लेने हैं यातून करूणा यांचा परळी येण्याचा हेतू उभ्या महाराष्ट्राला पहावयास मिळाला ते बरे ही झाले. करूणा शर्मा जेंव्हा परळीत आल्या तेंव्हा उभ्या महाराष्ट्राचे लक्ष हे प्रभु वैद्यनाथाच्या पायरीकडे होते. परंतू प्रभु वैद्यनाथही पायरीने राहणार्‍यालाच आपली पायरी चढू देतो हेही पुन्हा एकदा उभ्या महाराष्ट्राने याची देहि याची डोळा पाहितले. जेंव्हा करूणा शर्मा परळी आल्या आणि रायता फैलावण्या हेतू उफटसूळ पद्धतीने बोलू लागल्या तेंव्हा तेथील महिला भगिनींनी आमच्या दैवतावर शाब्दीक हल्ले करू नका म्हणत प्रचंड विरोध केला अन् इथच धनंजय मुंडेंच्या विरोधकांनी दुसरी पेरणी केली. ती पेरणी होती
गाडीतल्या पिस्तूलाची
मी माझ्या सासरवाडीत आली आहे. प्रभु वैद्यनाथाचा दर्शन मला घ्यायचं आहे, पत्रकार परिषद घेवून धनंजय मुंडेंना एक्सपोज करायचं आहे, पुरावे द्यायचे आहेत असे एक ना बारा कुटाणे कुटणार्‍या करूणा शर्माला जेंव्हा परळीत प्रचंड विरोध झाला तेंव्हा त्यांना गाडीत बसवण्यात आले आणि सुरक्षेच्या दृष्टीने गाडी पोलीस स्टेशनच्या दृष्टीने नेण्यात आली. गाडीची तपासणी केली तेंव्हा गाडीत एक पिस्टलसह जिवंत काडतूस दिसून आले. तेंव्हा मात्र खळबळ उडाली. करूणा शर्मांचा परळी पिस्तूल घेवून येण्याचा हेतू काय होता? हा प्रश्‍न उपस्थित होत असतांनाच धनंजय मुंडे यांनी शर्मा यांच्याकडून आपल्याला आणि कुटुंबियाला हानी होण्याची शक्यता असल्याचा संशय न्यायालयासमोर व्यक्त केला होता. मग त्या हेतूने तर करूणा शर्मा परळीत आल्या नव्हत्या ना? हा विचार उभा महाराष्ट्र करत असतांनाच करूणा शर्माच्या गाडीमध्ये पिस्तुल ठेवतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या बातम्या बाहेर आल्या, तो व्हिडीओ ही वार्‍यासारखा महाराष्ट्रात व्हायरल झाला. गाडीची डिग्गी उघडतांना तोंड बांधलेला एक संशयास्पद स्त्री वेशातला व्यक्ती त्यात दिसून आला आणि पुन्हा करूणा किती निष्पाप आहे? तिला कस अडकवलं जात याची पेरणी करण्याचा विरोधकांकडून मोठा प्रयत्न झाला. मात्र जेंव्हा वस्तुनिष्ठ प्रश्‍न उपस्थित केला गेला. एखादी सेन्सॉर गाडी चालक असतांना तिचे सगळी दार अ‍ॅटोमॅटीक बंद होतात मग मागची डिग्गी चलत्या गाडीत उघडली कशी? गाडीतील कुठला तरी  व्यक्ती अनलॉक करत नाही तोपर्यंत डिग्गी उघडलीच जावू शकत नाही. हा विषय मांडल्यानंतर विरोधक तिथही तोंडघशी पडले. रायता फैलावण्या हेतू आलेल्या करूणा शर्मा विरूद्ध गुन्हे दाखल झाला आाणि न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले. आता तरी धनंजय मुंडे यांच्या विरूद्ध रान उठवण विरोधक कमी करतील असं वाटत असतांनाच
परळी कलंकीत
ची ललकारी उठली तेंव्हा मात्र धनंजय मुंडेंचा पाठचा संघर्ष कधी संपणार नाही ते कुठे अडकत नसल्याचे पाहून ‘करूणा’कराच्याच आवयीवर आरत्या ओवाळून आत्मिक सुख मिळवण्याचं ध्येय धोरण विरोधकांनी कायम ठेवलं. बीड जिल्ह्यात गेल्या पाच-दहा वर्षाच्या कालखंडात अनेक कलंकीत घटना घडल्या. मुलींना गर्भातच मारणारे परळीतच जन्मले तेंव्हा परळी कलंकीत झाली नाही. काही ठिकाणी महिला मुलींवर बलात्कार झाले, तेंव्हा जिल्हा कलंकीत झाल्याचा आभासही कोणाला झाला नाही. जेंव्हा आपण पालक होतो तेंव्हा तर कित्येक कलंकीत घटना घडल्या त्या घटनांचा काळवंडपणाही कधी कोणाला दिसला नाही. गेल्या चार दशकापूर्वी जेंव्हा अशीच ‘करूणा’कराची ललाटी परळीवर घोंघावटत होती तेंव्हा स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी
प्यार किया तो डरना क्या?
असा सवाल करत, गो अ हेड म्हणत आलेल्या प्रत्येक गोष्टीचा सामना करण्याचे सांगितले होते. बाळासाहेबांच्या याच प्यार किया तो डरना क्या हे वाक्य तेंव्हा आत्मबळ देणारं ठरलं होतं. आत्मविश्‍वास वाढवणारं होतं, त्याच आत्मविश्‍वासाने महाराष्ट्राला सामोरं जाण्याचं हिंम्मत देणारं हेातं. ते वाक्य महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेणारं ठरलं, ते वाक्य महाराष्ट्राचं नेतृत्व करणारं ठरलं, तेच वाक्य समाजाला एकवटणारं ठरलं, त्याच वाक्याने महाराष्ट्राबरोबर देशाचं नेतृत्व करण्याचं आत्मबळ मिळालं, तेच वाक्य केंद्रात मंत्री पद मिळेपर्यंत सार्थकी ठरलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या प्यार किया तो डरना क्या या वाक्याने इतिहास घडवला असेल तर तुम लाख कोशीश करलो मुझे बदनाम करने की, मैं जब-जब बिखरा हूं दुगनी रफ्तारसे निखरा हूं हे धनंजय मुंडे यांचं वाक्य त्यांना अशा ‘करूणा’कराच्या कोरोना संसर्गातून का बाहेर काढणार नाही? आणि ‘करूणा’कराच्या कोरोना संसर्गाने परळी कलंकीत होईल? आता प्यार किया तो डरना क्या? या वाक्या नंतर प्रत्येकाने आत्मचिंतीत होत स्पष्ट केले तर अधिक बरे होईल. हा सर्व प्रकार म्हणजे
करूणा एक बहाना,धनंजय मुंडे निशाणा
असे एका वाक्यात म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. धनंजय मुंडेंचा यशाचा अश्‍व रोखता येत नाही, धनंजय मुंडे कुठे अडकलेले दिसत नाहीत मग अशा वेळी करूणाचा बहाना समोर करत धनंजय मुंडेंवर निशाणा साधण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे. तो असायलाही हवा, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मतभेद नक्कीच असायला हवेत परंतू मनभेदातून द्वेष, मत्सर, इर्शेतून एखाद्याला आयुष्यात उठवणे कितपत योग्य? हा सवाल कोणाला तरी उपस्थित करावाच लागेल आणि कंबराखालचा वार करण्याचा हेतूही समजून घ्यावा लागेल आणि तथाकथीतांचा ‘करूणा’कर नेमका परळीत आत्ताच का आला? याचा
शोध घ्यावा
लागेल. नुसता याच गोष्टीचा शोध नव्हे तर त्या दिवशी जे काही नाट्यमय घटनाक्रम झाले हे ही पहावे लागेल. मुंबई, पुण्याची करूणा शर्मा परळीला येण्यासाठी फेसबुक लाईव्ह करते काय? त्यात आव्हान देवून बोलते काय? बीडमध्ये आदल्यादिवशी येते काय? हॉटेलमध्ये राहतेय काय? परळीत गेल्यानंतर तिच्या गाडीत पिस्तुल सापडते काय? डिग्गी उघडली जाते, पिस्तुल ठेवण्याचा देखावा निर्माण केला जातो? पिस्तुल ठेवणारी व्यक्ती स्त्री वेशात असते, मात्र त्या व्यक्तीबरोबर संशय निर्माण व्हावा अशी त्या व्यक्तीची देहबोली कुठल्याही अँगलमधून डिग्गी उघडणारी बाई दिसत नाही. या सर्व गोष्टींचा नक्कीच शोध घ्यायला हवा. नसता हे सर्व रायता फैलान्या हेतूच हे स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. 

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!