पिंपळनेर (रिपोर्टर)- पिंपळनेरचे माजी उपसरपंच लक्ष्मीनारायण चरखा यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 87 वर्षांचे होते. आज दुपारी तीन वाजता पिंपळनेर येथे त्यांच्या पार्थीव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
लक्ष्मीनारायण चरखा गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना उपचारार्थ औरंगाबाद येथे हेडगेवार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज पहाटे सहा वाजता त्यांचे निधन झाले. काही काळ ते पिंपळनेरचे उपसरपंच होते. सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचे भरीव काम होते. मनमिळावू स्वभावाचे आणि तरुणांसाठी मार्गदर्शक असलेले लक्ष्मीनारायण चरखा आज काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या पश्चात मुलगा पत्रकार भगिरथ चरखा, श्यामसुंदर चरखा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार असून ते श्रीरंग चरखा यांचे चुलते होते. चरखा परिवाराच्या दु:खात सायं.दैनिक बीड रिपोर्टर परिवार सहभागी आहे.