Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडआयआरबी अन् महावितरणच्या गलथान कारभारामुळे कोळवाडी अंधारात

आयआरबी अन् महावितरणच्या गलथान कारभारामुळे कोळवाडी अंधारात


रस्त्याखालून टाकलेले केबल जळाले, सर्व्हीस रस्त्याचे काम अर्धवट, अपघाताचे प्रमाण वाढले

बीड (रिपोर्यर)- कपिलधार सर्व्हीस रस्ता ते कोळवाडी सर्व्हीस रस्त्याचे दोन्ही बाजु जोडणारा रस्ता अर्धवट केेलेला आहे. त्यामुळे कोळवाडी येथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. आयआरबीच्या वतीने कोळवाडीसाठी अंडरग्राऊंड केबल टाकून लाईट देण्यात आली होती, मात्र ते केबल जळाल्याने गेल्या काही दिवसांपासून अर्धे गाव अंधारात आहे. जळालेले केबल उघडे पडल्याने जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो. एकूणच आयआरबी टोल नाक्यावर पैसे वसूल करते मात्र सुविधांचा आभाव असल्याने ग्रामस्थात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


कपिलधार सर्व्हीस रस्ता ते कोळवाडी सर्व्हीस रस्ता दोन्ही बाजुने जोडण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे मात्र हा रस्ता अद्यापही जोडलेला नसल्याने तेथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. आयआरबीच्या वतीने रोडवर लोखंडी कठडे व जाळ्या बसवलेले नाहीत. शिवाय तेथे कुठलेही दिशादर्शक फलक लावलेले नाही. कोळवाडी येथे सोमेश्‍वर देवस्थान व श्रीक्षेत्र कपिलधार रस्त्यालाही दिशादर्शक फलक लावलेले नाही. कोळवाडी परिसरातील धनगरवाडी रस्ता, कपिलधार रस्ता व मोरेश्‍वर रस्त्यावरून येणार्‍या पाण्याचे आयआरबीने नियोजन न लावल्यामुळे हे सर्व पाणी शेतकर्‍यांच्या शेतात शिरत असून यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे. कोळवाडी बसस्टँडवर रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी जाळी लावणे आवश्यक असताना लावलेली नाही. सर्व्हीस रोडवर विद्युत पोल नसल्याने अंधार पडत आहे. यासह अन्य मागण्यांसाठी कोळवाड ग्रामस्थ संतप्त झाले असून ते महामार्गावर रस्ता रोको करणार असल्याची माहिती उपसरपंच तुळशीदास महाराज शिंदे, ग्रामपंचायत सदस्य आकाश शिंदे यांच्यासह आदींनी दिली आहे.

Most Popular

error: Content is protected !!