बीड (रिपोर्टर):- ‘शाळेत झालेली भांडणे आपण मिटवून घेवू’ असे म्हणून एका 14 वर्षीय मुलाला बोलावून बेदम मारहाण केली. ही घटना 19 जुलै रोजी बीड शहरातील चर्हाटा फाटा येथे घडली. या प्रकरणी काल दि. 21 रोजी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
मिरगे रो हाऊस माऊली नगर चर्हाटा रोड, बीड येथे राहणार्या एका 14 वर्षीय मुलाचे शाळेत भांडण झाले होते. त्यांनतर त्याला चौघाजणांनी 19 जुलै रोजी बोलावून आपण भांडन मिटवून घेवू असे म्हणून जुन्हा चर्हाटा रोडवरील एका हॉटेलजवळ नेले तेथे त्याला गंभीर मारहण करुन आमच्या नादी लागून नकोस नसता जिवे मारील असे म्हणून धकमी दिली. या प्रकरणी मुलाने दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांसह अनोळखी तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.