Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeक्राईमखळबळजनक...पाटबंधारा विभागात शेतकर्‍याने जाळून घेतले

खळबळजनक…पाटबंधारा विभागात शेतकर्‍याने जाळून घेतले


बीड (रिपोर्टर) पाटबंधारा विभागाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्याने एका निराश शेतकर्‍याने कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली. जखमी अवस्थेत शेतकर्‍याला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

शेतकर्‍याने यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेतली नसल्याने शेतकर्‍याने आज हे टोकाचे पाऊल उचलले.
बीड तालुक्यातील पाली येथील अर्जून कुंडलिकराव साळुंके या शेतकर्‍याची जमीन पाटबंधारा विभागाने संपादीत केलेली आहे. या जमिनीच्या एकत्रीकरणाबाबतचा वाद आहे.

गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी पाटबंधारा विभाग कार्यालयाचे उंबरे झिजवत आहे. कार्यालयाकडून न्याय मिळत नसल्याने सदरील शेतकर्‍याने गेल्या काही महिन्यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र याची दखल संबंधीत विभागाने घेतली नाही. आज दुपारी शेतकर्‍याने कार्यालयात पेट्रोल ओतून घेत जाळून घेतले. या घटनेने एकच खळबळ उडाली. शेतकर्‍यास तात्काळ जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!