प्रमाणावर, पैशासाठी माफियांचे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ, सर्वसामान्यात प्रचंड संताप
बीड (रिपोर्टर): शासन-प्रशासन व्यवस्थेचे सक्तीचे आदेश झुगारून स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने पाटोदा शहरात गुटखा, मटका, क्लबसह सर्वच अवैध धंदे प्रचंड तेजीत सुरू असून जिल्ह्यात सर्वाधिक गुटखा हा पाटोदा शहरात तस्करी होत असल्याची माहिती समोर येत असून गुटखा माफिये आणि मटका चालकांसह अन्य अवैध धंदे चालवणार्या माफियांचे कनेक्शन स्थानिक राजकीय पुढार्यांशी असल्याने हमाम मे सब नंगे होत लोकांच्या आरोग्याबरोबर अर्थकारणावर विपरीत परिणाम करत आहेत. येथील कायदा व सुव्यवस्थेसह अवैध धंदे रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असून माफिंयांसह माफियांना पाठीशी घालणार्या राजकीय वरदहस्तांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
पाटोदा शहरात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री होते. त्यापेक्षा अधिक तस्करी केली जात असल्याची माहिती समारे येत आहे. येथील गुटखा माफियांकडून पाटोदा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातल्या आणि नगर जिल्ह्यातल्या अनेक भागात गुटख्याचा सप्लाय होतो. महाराष्ट्र शासनाने बंद केेलेला गुटखा पाटोद्यातूनच मोठ्या प्रमाणावर इतरत्र वितरीत होत आहे. गुटख्या पाठोपाठ मटका, क्लब, बनावट दारू यासह अन्य अवैध धंदे पाटोदा शहरात तेजी करून आहेत. मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असताना याकडे स्थानीक पोलीस अथवा जिल्हा पोलीस अधिक्षक आणि उपअधिक्षक यांच्याकडे कधीच लक्ष गेलेले दिसून येत नाही. पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस उपअधिक्षक यांच्या डोळ्यांदेखत पाटोद्यात सर्रासपणे गुटख्याच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याशी खेळले जाते. मटका आणि क्लबच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लुटले जाते.
बनावट दारूसह हातभट्टीच्या कारखान्यातून सर्वसामान्यांना लुटले जाते. हे सर्व धंदे सुरू असताना पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करते हे आश्चर्य. गुटखा, मटका याचे माफिये आणि अन्य अवैध धंद्याचे माफिये यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जाते. राजकीय वरदहस्तामुळे हे धंदे तेजीत असून लोकांच्या अनेक तक्रारीनंतरही पोलीस याकडे दुर्लक्ष करतात. पोलिसांना या माफियांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक रसद पुरविली जाते. त्यामुळे पोलीस या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. पाटोदा शहराला आणि तरुण पिढीला उद्ध्वस्त करू पाहणार्या गुटखा, मटका, क्लब, बनावट दारू माफियांच्या तात्काळ मुसक्या बांधत वरदहस्त असलेल्या राजकीय पुढार्यांचे बुरखे टाराटर फाडत पोलिसांनी योग्य कारवाई करावी, गुटखा माफियांना जेरबंद करून मयका, क्लब हा तात्काळ बंद करावा, अशी मागणी आता सर्वस्तरातून होत आहे.