बीड (रिपोर्टर): बीड येथील राष्ट्रवादी भवनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक होत असून सदरच्या बैठकीचे आयोजन आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर व युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केले आहे. सदरच्या बैठकीला जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण झाल्यानंतर पक्षामध्ये शरद पवार-अजित पवार यांचे दोन वेगवेगळे गट पडले. आज शरद पवार यांच्या गटाची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवनामध्ये दुपारी एक वाजता सुरू झाली आहे. शरद पवार यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून व्यासपीठावर शरद पवार यांच्या गटाचे अनेक मान्यवर उपस्थित होते. सदरच्या बैठकीचे आयोजन बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. संदीप क्षीरसागर, युवक प्रदेशचे अध्यक्ष महेबूब शेख यांनी केले आहे. सदरची बैठक सुरू झाली असून मान्यवरांच्या भाषणाला सुरुवात झाली होती.