पाणी फाउंडेशनचा महेश लाखे गंभीर जखमी
जखमींना पाहून पुढे जाणारे तेवढेच दोषी
किल्ले धारूर (रिपोर्टर)- धारूर घाटात 23 जुलै रविवारी सकाळी साडेआठ सुमारास विचित्र अपघात झाला. या अपघातात सहा वाहने आपसात धडकली त्यातील दुचाकीस्वार गंभीर जखमी असून जखमी महेश लाखे यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेमध्ये घेऊन अंबाजोगाई येथील एस आर टी येथे नेण्यात आले.अरुंद रस्त्यामुळे रोज अपघातात प्रवाशांचा बळी, आर्थिक मानसिक तान सहन करत प्रवासी किती दिवस जीव घेणा ना सहन करणार. तर प्रवासी देवाला प्रार्थना करत आहेत की या घाटामध्ये लोकप्रतिनिधी – अधिकारी यांचा लवकरात लवकर बळी गेल्यानंतर च रस्ता होईल अशी अपेक्षा बाळगत आहेत.
धारूर घाटातील अरुंद रस्ता व अवघड वळणामुळे सतत अपघात होत असलेल्या धारुर घाटात 23 जुलै रविवार रोजी सकाळी पुन्हा विचित्र अपघात झाला. घाटातील एका अवघड वळणावर सिमेंट घेऊन जाणारा वाहन व चार चाकी ाह 22 -थ3109 किया कंपनीच्या गाडीला अपघात केला. हा अपघात होतो का नाही त्याच जागेवर त्याच वेळेमध्ये अपघातग्रस्त असलेल्या जागेवर दुसरा सिमेंट घेऊन जाणारा वाहनाने दुचाकीस्वाराला मागून धडक बसल्याने दुचाकी ाह 23 ग 9310 समोर असलेल्या क्रुझर एम.एच.13 डी.ई. 1478 ला मागून जाऊन आदळली. तर क्रूजर च्या पुढे एका टिप्परवळ क्रुझर आदळी त्यात टिप्पर वाला तिथून फरार झाला या अपघातामध्ये दुचाकी वरील एक जण गंभीर जखमी आहे. जखमी हा महेश लाखे नावाचा पाणी फाऊंडेशनचा कार्यकर्ता असून तो कामानिमित्त जात होता सदरील जखमीला रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टर अरविंद निकते यांनी पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय मध्ये घेऊन गेले आहेत त्यांच्यावर येथे उपचार चालू आहे.