Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeकोरोना24 तासांमध्ये देशातील करोना रुग्णसंख्या 7.7 टक्क्यांनी घटली

24 तासांमध्ये देशातील करोना रुग्णसंख्या 7.7 टक्क्यांनी घटली


मुंबई (रिपोर्टर)-देशात गेल्या 24 तासांमध्ये 34 हजार 973 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसात 37 हजार 681 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब अशी की, शुक्रवारच्या (9 सप्टेंबर) तुलनेत नव्या करोना रुग्णसंख्येत 7.7 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचप्रमाणे, नव्या करोना रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांचा आकडा देखील मोठा आहे. मात्र, करोनामुळे देशात होणार्‍या मृत्यूचा आकडा चिंताजनक आहे. गेल्या 24 तासांत देशात करोनामुळे 260 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही अधिकृत आकडेवारी जारी केली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, देशात सद्यस्थितीत एकूण 3 लाख 90 हजार 646 ऍक्टिव्ह करोना रुग्ण आहेत. तर देशातील आतापर्यंतची एकूण करोना रुग्णसंख्या ही 3 कोटी 31 लाख 74 हजार 954 वर पोहोचली आहे. त्याचसोबत, करोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा 3 कोटी 23 लाख 42 हजार 299 इतका आहे. तर, देशात करोनामुळे आतापर्यंत 4 लाख 42 हजार 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सद्यस्थितीत करोनाचा रिकव्हरी रेट 97.49 टक्के इतका आहे.
गेल्या 24 तासांत एकंदर आकडेवारी पाहता केरळ राज्याची चिंता कायम आहे. देशातील 34 हजार 973 नव्या करोना रुग्णांपैकी तब्बल 26 हजार 200 रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. तर याच एका दिवसांत केरळमध्ये करोनामुळे 114 मृत्यूची नोंद झाली आहे.
करोना लसीकरणाबाबत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 67 लाख 58 हजार 491 नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण 72 कोटी 37 लाख 84 हजार 586 नागरिकांना लस देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!