टू-डी इको व स्ट्रेस स्ट्रेस मशीनचा सर्वसामान्य रुग्णांना होणार फायदा बाहेर तपासणीसाठी लागत होते 1500 रुपये आता जिल्हा रुग्णालयात फक्त 300 रुपयात होणार तपासणी
बीड (रिपोर्टर): जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या काही वर्षापासून अमुलाग्र बदल होत असून सर्वसामान्यांना या ठिकाणी चांगले उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या पुढाकारातून त्यांची टीम या ठिकाणी दिवस-रात्र काम करत आहे. डॉक्टर सुरेश साबळे यांच्या पुढाकारातून जिल्हा रुग्णालयामध्ये 2डी इको व स्ट्रेस स्ट्रेस या दोन मशीनचे आज (ता. 24) उद्घाटन जेष्ठ पत्रकार संजय मालाणी व पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी व्यंकटेश वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ. नागेश चव्हाण डॉ. संजय राऊत, डॉ. अनंत मुळे, पञकार जालिंदर धांडे, रमा गिरी, श्रीमती धांडे, श्रीमती परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार मिळावे, यासाठी राज्य शासनाकडून कोटी रुपयांचा खर्च केला जातो. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून डॉ. सुरेश साबळे आल्यापासून सर्वसामान्यांना या ठिकाणी वेळेत व चांगले उपचार मिळू लागले आहेत. जिल्हा रुग्णालयात कोणकोणत्या अत्याधुनिक मशीन कमी आहेत. यासाठी सतत पाठपुरावा करून जिल्हा रुग्णालयामध्ये त्या मशीन उपलब्ध करण्याचे काम डॉ. सुरेश साबळे यांच्या पुढाकारातून होत आहे. हृदयरोग संदर्भात जिल्हा रुग्णालयामध्ये टू डी ईको व स्ट्रेस स्ट्रेस या दोन मशीन उपलब्ध नव्हत्या या मशीन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना या तपासण्या करण्यासाठी बाहेर 1500 रुपये खर्च येत होता तो खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नव्हता. या बाबीच्या अनुषंगाने डॉ. सुरेश साबळे यांनी या दोन मशीन जिल्हा रुग्णालयात असाव्यात यासाठी पुढाकार घेतला होता. या दोन्ही मशीन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाल्या असून आज या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. या मशीन साठी डॉक्टर संजय राऊत यांनी सुद्धा विशेष प्रयत्न केले