Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमदुचाकी चोर पुन्हा सक्रिय बीड, दिंद्रुडमधून दुचाकी लंपास

दुचाकी चोर पुन्हा सक्रिय बीड, दिंद्रुडमधून दुचाकी लंपास

बीड (रिपोर्टर)- गेल्या महिन्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळून शेकडो दुचाकी जप्त केल्या होत्या. मात्र पुन्हा दुचाकीचोर सक्रिय झाले असून आष्टी, बीड शहरातून काल दुचाकी लंपास झाल्या.
रामनाथ बन्सी राठोड (रा. मोगरा ता. माजलगाव) या शेतकर्‍याने लोणगाव चारी जवळ लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे तर राजूदास उत्तम जाधव (रा. जालना रोड बीड) यांनी एलआयसी ऑफीस समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. या प्रकरणी त्यांनी शिवाजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!