Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडगेवराईपैठणचा उजवा कालवा फुटला बागपिंपळगाव जवळ पडले भगदाड

पैठणचा उजवा कालवा फुटला बागपिंपळगाव जवळ पडले भगदाड


गेवराई (रिपोर्टर) पाटबंधारे उपविभाग,गेवराईच्या अंतर्गत येणारा पैठणचा उजवा कालवा बागपिंपळगाव ता. गेवराई जवळ फुटला असून, कालव्या शेजारची शेतजमीन पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. सदरील कालवा चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे या कालव्यात पाणी आल्याने हा कालवा फुटल्याची शक्यता असून संबंधित विभागाचा अद्याप एक ही अधिकारी या परिसरात फिरकला नसल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पावसाच्या पाण्याने कालवा गुडघाभर वाहत असून, एका बाजूने कालव्यातून पाझर सुरू आहे. दरम्यान आज दुपारी 12 वा. एका शेतकर्याने दिलेल्या माहितीनुसार घटना उघडकीस आली असून संबंधित विभागाला याची माहिती कळवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Most Popular

error: Content is protected !!